JOIN US
मराठी बातम्या / विदेश / भारत-ऑस्ट्रेलियात व्यापार करार, कराराचा आनंद साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी बनवली खास इंडियन डिश

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापार करार, कराराचा आनंद साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी बनवली खास इंडियन डिश

या नवीन व्यापार कराराचा आनंद साजरा करण्यासाठी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian Prime Minister Scott Morrison) यांनी शनिवारी इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 10 एप्रिल: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात नवीन व्यापार करार झाला आहे. या नवीन व्यापार कराराचा आनंद साजरा करण्यासाठी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian Prime Minister Scott Morrison) यांनी शनिवारी इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते त्यांचे भारतीय समकक्ष नरेंद्र मोदी यांची आवडती डिश खिचडी (khichdi) बनवताना दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार कॅनबेरा, कपडे, चामडे, दागिने आणि क्रीडा संबंधित उत्पादने यांसारख्या बाजारपेठांमध्ये 95 टक्क्यांहून अधिक भारतीय वस्तूंचा करमुक्त प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल रोजी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी केली.

संबंधित बातम्या

मॉरिसनने शनिवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, भारताशी आमचा नवीन व्यापार करार साजरा करण्यासाठी मी आज रात्री बनवण्यासाठी निवडलेली करी माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात प्रांतातील आहे. यामध्ये त्याच्या आवडत्या खिचडीचा समावेश आहे. मॉरिसन यांचं खिचडी प्रेम आपल्या कुटुंबाचा संदर्भ देत ते म्हणाले की, ‘‘जेन, मुली आणि आई सगळ्यांनी होकार दिला.’ फोटो असलेल्या पोस्टला 12 हजारांहून अधिक ‘लाइक्स’ आणि 900 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये खिचडीबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या