सिडनी, 05 डिसेंबर : गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून 4 दिवसीय भारत दौरा रद्द केला आहे. स्कॉट मॉरिसन म्हणाले की, सध्या देशात आगीचा वणवा भडकला आहे. या संकटात आमचे लक्ष देशातील लोकांना मदत करण्याकडे आहे. काही लोकांची सुखरूप सुटका झाली असून काही अजुनही आगीशी झुंज देत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत 18 लोकांचा आणि जवळपास 5 कोटी प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आहेत. या भागालाही आगीने वेढले आहे. किनाऱ्याकडे वेगाने पसरणाऱ्या या आगीमुळे आतापर्यंत 200 हून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. काही लोक आगीच्या वेढ्यात अडकले आहेत.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.
आग नैसर्गिक कारणांमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे. अॅमेझॉनप्रमाणे या जंगलातदेखील वणवे लागतात. या वर्षी दुष्काळाच्या झळा प्रचंड बसल्या होत्या. ऊन आणि वेगाचा वारा यामुळे आग झपाट्याने पसरली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 2017 च्या आधीपासून ऑस्ट्रेलिया दुष्काळाचा सामना करत आहे. नोव्हेंबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढले होते. यंदाच्या हंगामात उष्णता वाढण्याची शक्यता आहे यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. वाचा : दारु पिऊन तरुणाचा कोब्रासोबत नागीण डान्स, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO