JOIN US
मराठी बातम्या / विदेश / BREAKING: आणखी एका हवाई हल्ल्यानं उडवली काबुलची झोप, पहाटेच विमानतळावर तोफांचा मारा

BREAKING: आणखी एका हवाई हल्ल्यानं उडवली काबुलची झोप, पहाटेच विमानतळावर तोफांचा मारा

Afghanistan Crisis: रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर (Drone attack on ISIS) सोमवारी सकाळी काबूल विमानतळाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला (air strike at kabul airport) केल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 30 ऑगस्ट: तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशात अचानक बॉम्बस्फोटांची संख्या वाढली आहे.  रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर (Drone attack on ISIS) सोमवारी सकाळी काबूल विमानतळाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला (air strike at kabul airport) केल्याची माहिती समोर आली आहे.  सकाळी सकाळी केलेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. वृत्तसंस्था AFPनं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी काबूल शहरावरून रॉकेट हल्ला होताना अनेक नागरिकांनी पाहिलं आहे. काबूल विमानतळ परिसरात राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांनी मिसाइल डिफेन्सिव्ह सिस्टीमला अक्टिव्हेट होतानाचा आवाज ऐकला आहे. त्याचबरोबर अनेक नागरिकांनी काबूल विमानतळ परिसरात धूराचे लोट उठताना पाहिले आहेत. संबंधित हल्ल्याबाबत तूर्तास एवढीच माहिती समोर आली असून याची बातमी अपडेट होतं आहे…. हेही वाचा- Afghanistan Crisis: अमेरिकेनं ISISवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 निष्पाप चिमुकल्यांचा बळी दुसरीकडे, इसिसनं काबूल विमानतळावर आत्मघाती विस्फोट घडवून आणल्यानंतर, रविवारी अमेरिकेनं इसिसच्या दहशतवादी तळावर ड्रोननं (Drone Attack at ISIS) हल्ला केला आहे. संबंधित इसिसचा दहशतवादी कारनं काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या बेतात होता, याची माहिती मिळताच अमेरिकेनं ताबडतोब प्रतिहल्ला म्हणून हा ड्रोन हल्ला केला आहे.  पण या हल्ल्यात तीन निष्पाप मुलांचाही जीव गेल्याची माहिती एका अफगाण अधिकाऱ्यानं दिली आहे. हेही वाचा- अफगाणिस्तानातील महिला शिक्षण घेऊ शकणार का? तालिबानचा अजब फतवा अमेरिकन ड्रोन हल्ल्यात एक कारला लक्ष्य केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली आहे. ज्यामध्ये अनेक आत्मघातकी हल्लेखोर असल्याची चर्चा आहे. हे हल्लेखोर काबूल विमानतळावर हल्ला करणार होते असंही सांगण्यात येत आहे. अमेरिकेनं इसिसवर केलेला हा दुसरा हवाई हल्ला आहे. यापूर्वी गुरुवारी इसिसनं काबूल विमानतळावर हल्ला करून 13 अमेरिकन सैनिकांसह अनेक अफगाण नागरिकांना निर्दयीपणे हत्या घडवून आणली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या