JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली मोठी घोषणा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली मोठी घोषणा

भारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 16 मे : चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही सुरूच आहे. त्यावर अद्याप ठोस असं वॅक्सीन मिळालेलं नाही. अनेक देशांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करून असंही ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘मित्र राष्ट्र असलेल्या भारताला अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान करण्याची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आम्ही आहोत. मैत्रीपूर्ण संबंध असलेला भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा पराभव करू. यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.’

संबंधित बातम्या

हे वाचा- सर्वात मोठं यश! 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला कोरोना व्हायरसविरुद्ध लस विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे. सर्व जगभर सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे. आणि तो म्हणजे कोरोनावर औषध केव्हा येणार. जागतिक महासत्ता असलेला अमेरिका यावर औषध शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. अमेरिकेने आपले सर्व प्रयत्न या कामासाठी लावले आहेत. कोरोनावर औषध शोधण्याच्या कामासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन खास माणसांची नियुक्ती केली आहे. 2020च्या डिसेंबर पर्यंत किंवा 2021च्या जानेवारी महिन्यात हे औषध तयार होईल असा अंदाज अमेरिकेत व्यक्त होत आहे. हे वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला सर्वात कठोर धमकी, तर अमेरिका हे टोकाचं पाऊल उचलणार संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या