JOIN US
मराठी बातम्या / विदेश / इथं लोक पार्किंगमधील गाड्यांना करत नाहीत लॉक; कारची खिडकी, दरवाजा, डिग्गीही उघडीच ठेवतात कारण...

इथं लोक पार्किंगमधील गाड्यांना करत नाहीत लॉक; कारची खिडकी, दरवाजा, डिग्गीही उघडीच ठेवतात कारण...

या शहरांमध्ये लोकांनी कार सरेंडर प्रोसेस (Surrender Process) अर्थात आत्मसमर्पण प्रक्रिया वापरण्यास सुरुवात केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 22 डिसेंबर : पार्किंगमधील महागड्या गाड्यांच्या (Luxury Cars) काचा फोडून, दरवाज्याचं लॉक तोडून आतील वस्तूंची चोरी झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो. अर्थात यात गाडीचं आणि पर्यायानं मालकाचं मोठं नुकसान होतं. महागड्या गाड्या आणि त्यातील वस्तू चोरीला जावू नयेत यासाठी अनेक लोक कुलपाचा वापर करतात. अशा स्थितीत कुलूप तोडून चोरी करण्याच्या नादात चोरटे संपूर्ण गाडीचं नुकसान करतात. जेव्हा अमेरिकेतील (America) सॅन फ्रान्सिको (San Francisco) आणि ऑकलॅंड (Oakland) या शहरांमध्ये कार चोरीच्या घटना वाढल्या, तेव्हा तिथल्या लोकांनी अजब फंडा शोधून काढला. त्यांनी सरेंडर प्रोसेस (Surrender Process) अर्थात आत्मसमर्पण प्रक्रिया वापरण्यास सुरुवात केली. अलीकडच्या काही महिन्यांत सॅन फ्रान्सिको आणि ऑकलॅंडमध्ये वाहनांचे कुलूप तोडून चोरीच्या (Theft) घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या गाड्यांची डिग्गी, दरवाजे, काचा उघड्या करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहनांमधील वस्तू चोरून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. एनबीसी बे एरियाच्या (NBC Bay Area) अहवालानुसार, सॅन फ्रान्सिकोमध्ये कारमधून वस्तु चोरण्याच्या घटनांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  त्यामुळे येथील लोकांनी नुकसान टाळण्यासाठी गाड्यांचे दरवाजे आणि डिक्की उघडी ठेवण्यास सुरवात केली. हे वाचा -  Tata Motors चा राज्य सरकारसह करार, महाराष्ट्र सरकारसह मिळून बनवणार स्क्रॅप सेंटर गाड्यांची तोडफोड करून त्यातील वस्तू चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या लोकांनी अवलंबलेली पद्धत खरोखर अनोखी म्हणावी लागेल. गाडीची डिक्की उघडी ठेवली म्हणजे त्यात चोरी करण्यासारखं काही नाही, असा संदेश यातून दिला जात आहे. गाडीच्या आत काही नाही, हे पाहून चोर निघून जावेत यासाठी येथील लोक आता आपल्या गाड्यांची डिक्की उघडी ठेवून पार्किंग करत आहेत.  लोक त्यांच्या गाडीच्या खिडक्यांवर कृपया कारच्या दरवाज्याचा वापर करा, कारच्या काचा फोडू नका. गाडीत काहीही नाही. असं लिहित आहेत. यामुळे किमान चोरटे पार्क केलेल्या गाडीची खिडकी किंवा अन्य काचा फोडणार नाहीत. हे वाचा -  निम्म्याहून कमी किमतीत मिळतेय Mahindra ची ही Car, पाहा काय आहे ऑफर मात्र लोकांची ही भूमिका पाहून पोलिसांनी त्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. असं केल्यानं चोर गाडीतील बॅटरी (Battery) आणि टायर्स चोरून नेऊ शकतात, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या