न्यूयॉर्क, 19 डिसेंबर: गोल्फ टायकून टायगर वुड्सपेक्षाही (Tiger Woods) जास्त फॉलोअर्स (More followers) असणाऱ्या एका गोल्फ प्लेअरची (Golf player) सध्या अमेरिकेत (America) वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगत आहे. ती घालत असलेले रिव्हिलिंग कपडे (Bold costumes) हे त्यामागचं खरं कारण. खरं तर गोल्फ हा श्रीमंत लोकांचा खेळ मानला जातो. या खेळाच्या मैदानापासून ते त्यासाठीच्या साहित्यापर्यंत सर्वच गोष्टी या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यासाठी भलीमोठी रक्कम मोजावी लागते आणि गोल्फ खेळणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे हा खेळ खेळणारे खेळाडू कसं खेळतात, त्याबरोबरच त्यांचा पेहराव, देहबोली, वागण्याच्या पद्धती, लुक्स आणि इतर अनेक गोष्टींवर गोल्फप्रेमीचं बारीक लक्ष असतं. अमेरिकेतील एक गोल्फ प्लेअर सध्या गोल्फ सोडून इतरच कारणासाठी चर्चेत आहे. कपड्यांवर आक्षेप अमेरिकेतील प्रसिद्ध गोल्फ प्लेअर पेज स्पिरनाक (Paige Spiranac) ही जगातील सर्वात हॉट खेळाडू मानली जाते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तुम्ही भेट दिलीत, तर त्यामागचं कारणही तुमच्या लक्षात येईल. गोल्फसाठी वापरण्यात येणारा पारंपरिक पोशाख सोडून भलत्याच कपड्यांमध्ये ती मैदानात येते, अशी गोल्फप्रेमींची तक्रार आहे. ही बाब त्यांना पसंत नसून त्यामुळे गोल्फ खेळाच्या डिनेन्सीवर त्याचा परिणाम होत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
टायगर वुड्सपेक्षाही जास्त फॉलोअर्स पेजच्या गोल्फ खेळातील कौशल्यासोबतच तिच्या अदांवर जगभरातील चाहते फिदा आहेत. त्यामुळेच तिचे फॉलोअर्स हे टायगर वुड्सपेक्षाही जास्त आहेत. पेज ही तिच्या इन्स्टाग्राम पेजवर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि बोल्ड लूकमधील व्हिडिओ शेअर करत असते. ते पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः ऑनाईन रिघ लागत असल्याची चर्चा आहे. हे वाचा- पाकिस्तान हादरलं; नाल्यात झालेल्या स्फोटात डझनभर लोकांचा मृत्यू, 12 जखमी लोकांच्या विक्षिप्त प्रतिक्रिया मला असे कपडे घालणं आवडतं, असं पेज म्हणते. माझ्या शरीरावर माझं अतोनात प्रेम असून तो माझ्या व्यक्तीमत्त्वाचाच एक भाग असल्याचं पेज म्हणते. लोकांना पारंपरिक वेषात गोल्फ पाहण्याची वर्षानुवर्षं सवय झाली आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या कपड्यांत मला पाहून विचित्र वाटत असावं, असं ती म्हणते. वास्तविक, काही वर्ष गोल्फ खेळून ती प्रोफेशनल गोल्फमधून 2016 सालीच निवृत्त झाली आहे. मात्र अजूनही हौस म्हणून ती गोल्फ खेळते आणि आपले फोटो शेअर करत राहते.