ही भयंकर आणि क्रूर अशी शोकप्रथा आहे.
एरिझोना(अमेरिका), 18 मार्च: जगभरात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळं जगभरातल्या घडामोडी एका क्लिकवर पाहायला मिळतात. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी क्षणार्धात सगळीकडे पसरतात. या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचाही नेम नसतो, पण यातून अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळते. मनोरंजन होतं एवढं मात्र खरं. सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालतोय तो व्हिडिओ आहे एका अमेरिकेतील मुलीचा. ही मुलगी पेशानं मॉडेल आहे. तिनं नुकताच एक व्हिडिओ टिकटॉकवर (Tik Tok) शेअर केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच इतका व्हायरल झाला की त्याला तब्बल 40 लाख व्ह्यूज मिळाले. काय आहे हा व्हिडिओ याची उत्सुकता वाढली ना? तर हा आहे या मुलीच्या मधल्या बोटाचा (Middle Finger). या मुलीचं मधलं बोट चक्क पाच इंच लांब (Five Inch Long Middle Finger) आहे. इतर बोटांपेक्षा खूपच मोठं. खरंतर बायकांच्या तळहाताची लांबी सर्वसाधारणपणे 6.8 इंच असते, इथं या मुलीचं एक बोटंच पाच इंच लांबीचं आहे.
या मुलीचं नाव आहे ऑलिव्हिया मेर्सिया (Olivia Mercia), अमेरिकेतील एरिझोना (Arizona) प्रांतात ती राहते. ऑलिव्हियानं शेअर केलेल्या व्हिडिओत ती स्वतःचं मधलं बोट जे इतर बोटांपेक्षा प्रमाणाबाहेर लांब आहे, ते दाखवत आहे. ती म्हणते, आधी मला या अती लांब बोटामुळं खूप काळजी वाटायची. अडचण वाटायची. मग माझ्या लक्षात आलं की ही खूप गंमतीची बाब आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकेल. ही जाणीव झाल्यावर मला माझ्या बोटाबद्दल वाटणारी काळजी, अडचण दूर झाली. आता मी याकडे सकारात्मक पद्धतीने बघते. आता ही माझ्यातील उणीव वाटत नाही तर मला मिळालेलं वरदान वाटतं. त्यामुळं मी आता बिनधास्तपणे माझ्या या दुर्मीळ बोटाबद्दल बोलते. ते लपवत नाही. (**हे वाचा:** भयंकर! हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि… Shocking video viral ) ऑलिव्हिया मेर्सियाच्या या व्हिडिओचं लोकांनी स्वागत केलं असून, तिच्या विचारांचं कौतुक केलं आहे. अनेकांना यामुळं प्रेरणा मिळाली आहे. आपल्यातील एखादं व्यंग, सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळी गोष्ट असेल तर ती दडवून न ठेवता खुलेपणानं ते स्वीकारलं तर जगही आपल्याला हरवू शकत नाही. आपलं व्यंग एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत असेल तर त्याबद्दल कमीपणा का वाटून घ्यायचा, असा प्रेरणादायी संदेशही या व्हिडिओमधून मिळत आहे. त्यामुळं ऑलिव्हिया या व्हिडिओला तब्बल 40 लाख व्ह्यूज मिळाले असून, ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. https://navbharattimes.indiatimes.com/viral-adda/video/social-masala/woman-goes-viral-for-her-extremely-long-5-inch-middle-finger-video-goes-viral-51827/