मॅथ्यूला वाटत होतं की, ऍश्ले प्रयत्न करून थकल्यावर स्वत:लाच दोष देईल आणि हा विषय बंद होईल. त्याच्या याच विचाराने ऍश्ले दुखावली गेली.
बीजिंग 13 मार्च : आई बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या एखाद्या महिलेला अचानक ही गोष्ट समजली की ती महिला नसून पुरुष आहे तर? ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीसाठी धक्कादायक असेल. अशीच घटना घडली आहे. चीनमध्ये. ही महिला गरोदर (Pregnant) राहाण्यासाठी गेल्या एका वर्षापासून प्रयत्न करत होती. मात्र, ती गरोदर होऊ शकली नाही. नुकतंच ती आपल्या पायाला झालेली दुखापत दाखवण्यासाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला समजलं की ती स्त्री नसून पुरुष आहे. डॉक्टरांनी या महिलेला सांगितलं, की तिच्यामध्ये पुरुषाचे वाय गुणसूत्र (Male Y Chromosome) आहेत. मात्र, याशिवाय ती आयुष्यभर महिलेच्या रुपात राहू शकते. या कारणामुळे नाही राहू शकली गरोदर - खरं तर, 25 वर्षीय विवाहित महिला तिच्या जखमी घोट्याच्या एक्स-रेसाठी (X-Ray) डॉक्टरांकडे गेली. तिथे डॉक्टरांनी तिला सांगितलं, की ती दुर्मिळ अवस्थेनं ग्रस्त आहे आणि यामुळे तिला कधीच मासिकपाळी आली नाही आणि ती गर्भवती होऊ शकली नाही. ‘डेली मेल’ च्या अहवालानुसार महिलेची खरी ओळख लपवण्यासाठी तिचं नाव पिंगपिंग असं ठेवलं गेलं आहे. डॉक्टरांनी हा खुलासा केल्यानंतर या महिलेला मोठा धक्का बसला आहे. 46 XY Disorder नं पीडित - डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिला लैंगिक विकासाच्या एक्स 46 विकारानं (46 XY disorder of sexual development) पीडित आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये जननेंद्रियाचे अवयव (Genital Organs) अस्पष्ट, अविकसित किंवा पुरुष गुणसूत्र असलेल्या लोकांमध्ये नसतात. पिंगपिंगचे अवयव महिलांप्रमाणं असल्यामुळं तिनं कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. काहीतरी वेगळ्याच कारणानं मासिक पाळी येत नसावी असा तिचा समज होता. तिनं सांगितलं, की मासिक पाळी न येणं हादेखील तिच्यासाठी चिंतेचा विषय होता. मात्र, लाजून तिनं याबद्दल कधी काही सांगितलं नाही. महिलेच्या पायाचा एक्स रे काढताना डॉक्टरांना तिच्या काही अविकसित हाडांबद्दल माहिती झालं. याबद्दल अधिक तपासणी केली असता त्यांना समजलं, की पिंगपिंगचा जन्म महिला नाही, तर पुरुषाच्या रुपात झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं, की पिंगपिंगमध्ये गर्भाशय किंवा अंडाशय नाही. याच कारणामुळं ती कधीही गरोदर होऊ शकली नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता या महिलेमध्ये कोणताही पुरुषाचा अवयव नाही. सर्जरी किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीच्या माध्यमातून याच्यावर उपचार केले जाऊ शकतात. मात्र, पिंगपिंगनं अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.