JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तान हादरलं, काबुलच्या मशिदीत बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान हादरलं, काबुलच्या मशिदीत बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये (Bomb blast in Kabul) बॉम्बस्फोट झाला आहे. काबुलमधल्या एका मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे, यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबुल, 17 ऑगस्ट : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये (Bomb blast in Kabul) बॉम्बस्फोट झाला आहे. काबुलमधल्या एका मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे, यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 40 जण जखमी झाले आहेत. काबुलच्या इमरजन्सी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 27 जणांना दाखल करण्यात आलं आहे, यामध्ये 5 लहान मुलांचा समावेश आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण भागाला तालिबानच्या सुरक्षा रक्षकांनी सील केलं आहे. सध्या जखमींना काबुलच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आणलं जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काबुल शहराच्या सर ए कोटल खैरखानामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. काबुलचं सिक्युरिटी डिपार्टमेंट खालिद जरदानने या स्फोटाची पुष्टी केली आहे. मशिदीत केलेल्या या बॉम्बस्फोटाची अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून जबाबदारी घेण्यात आलेली नाही. पण मागच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या बऱ्याच हल्ल्यांमध्ये मशिदीला लक्ष्य करण्यात आलं आहे, पण यावेळचा हल्ला वेगळा असल्याचं स्थानिक मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत शिया मशिदींना दहशतवादी संघटना आयएसद्वारा लक्ष्य केलं जात होतं, पण आता ज्या भागात बॉम्बस्फोट झाला आहे तिकडे शिया लोकसंख्या नाही. काबुलमध्ये सध्या तालिबानचं सरकार आहे. काहीच दिवसांपूर्वी तालिबान सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. अशरफ गनी यांना सत्तेतून बाहेर काढत तालिबानने काबुलवर कब्जा केला. तालिबानमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये बॉम्बस्फोटांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वीही काबुलच्या एका मशिदीमध्ये धमाका झाला होता, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला. त्याआधी अफगाणिस्तानमधल्या गुरूद्वारांनाही टार्गेट करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या