काबूल, 26 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर आहे. काही वेळापूर्वी तालिबानांनी आणखी एका पत्रकाराची हत्या केली असं वृत्त समोर आलं होतं. मात्र त्यांची हत्या झाल्याचं वृत्त केवळ अफवा असल्याचं समोर येत आहे. जियार यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. क्रूर तालिबाननं याआधी भारताचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची हत्या केली होती. दानिश यांना गोळी मारण्यात आली होती.
याआधी TOLO NEWS नं दिलेल्या वृत्तानुसार, जियार याद असं हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. जियार आणि त्यांच्या कॅमेरामनला तालिबानच्या दहशतवाद्यांनी मारहाण केली. या घटनेदरम्यान दोघंही अफगाणी लोकांच्या गरिबी आणि बेरोजगारीवर रिपोर्टिंग करत होते. टोलो न्यूजनं पुढे म्हटलं की, तालिबाननं जियार याद यांचा फोन आणि अन्य वस्तू जप्त केल्यात. कॅमेराही तोडून टाकला आहे.
दरम्यान वृत्त समजताच जियार यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन हत्येचं वृत्त निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, अचानक माझ्यावर हल्ला का केला हे मला अजूनही माहित नाही. ते असे का वागले हे देखील माहित नाही. ही घटना तालिबान नेत्यांसोबत शेअर करण्यात आली आहे. तथापि, गुन्हेगारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गंभीर धोका आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, काबूलच्या न्यू सिटीमध्ये तालिबान्यांनी मला मारहाण केली होती. कॅमेरे, तांत्रिक उपकरणे आणि माझा वैयक्तिक मोबाईल फोन देखील हायजॅक करण्यात आला आहे. काही लोकांनी माझ्या मृत्यूची बातमी पसरवली आहे जी खोटी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी महत्त्वाची, हे आहेत देशातल्या तिसऱ्या लाटेचे संकेत दुसरीकडे काबूल विमानतळावर पुन्हा चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या 10 दिवसात काबूल विमानतळावर गोळीबार आणि चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.