JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / Pictures : हातांच्या पंज्यासारखं दिसतं हे प्रसिद्ध बेट, कित्येक शतकांआधी तयार झाल्या होत्या भिंती, पाहा PHOTOS

Pictures : हातांच्या पंज्यासारखं दिसतं हे प्रसिद्ध बेट, कित्येक शतकांआधी तयार झाल्या होत्या भिंती, पाहा PHOTOS

Bavljenac island in Adriatic Sea : एड्रियाटिक समुद्रावर बावल्जानिक नावाचे एक बेट आहे, जे अंगठ्याच्या किंवा बोटाच्या ठशासारखे दिसते. हे बेट सिबेनिक द्वीपसमूहातील 249 बेटांपैकी एक आहे. या बेटाचा वापर जवळच्या कॅप्रिज बेटावरील शेतकरी शेतीसाठी करत होते. या ठिकाणी बांधलेल्या दगडी भिंती वरून बोटांच्या ठशाप्रमाणे दिसतात. पाहा PHOTOS

0106

क्रोएशिया हा नैसर्गिक चमत्कारांचा एक नमुना आहे. बाव्हलेजेनिक बेट हे दगडी भिंतींच्या नेटवर्कने बनलेलं आहे, जे Google Earth च्या फोटोंमध्ये अंगठ्याच्या ठशासारखे स्पष्टपणे दिसते.

जाहिरात
0206

या बेटाला बालजेनिक बेट असंही म्हणतात. हे 0.14 चौरस किलोमीटर क्षेत्रात वसलेलं आहे.

जाहिरात
0306

क्रोएशियन नॅशनल टुरिस्ट बोर्डाच्या म्हणण्यानुसार हे बेट एंड्रियाटिक समुद्रात सापडलं होतं आणि ते शेतीसाठी वापरले जात होतं. येथे राहणारे लोक पूर्णपणे शाकाहारी होते.

जाहिरात
0406

लिंबाची सर्वाधिक झाडे येथे लावण्यात आलेली आहे. संपूर्ण बेटावर दगडी भिंतींचे संपूर्ण जाळे उभारण्यात आलेले आहे. याचं कारण म्हणजे वाऱ्यापासून पिकाचं संरक्षण करता येते. संपूर्ण शेताला वेगवेगळ्या प्लॉटमध्ये विभागून भिंती बनवल्या आहेत.

जाहिरात
0506

या भिंती 1800 मध्ये बांधल्या गेल्याचं सांगितलं जातं. या भिंती ड्राय स्टोन वॉलिंग तंत्राचा वापर करून बनवल्या गेल्या आहेत, ज्या एकमेकांपासून लॉक केल्या आहेत.

जाहिरात
0606

हे बेट 2018 पासून संरक्षित केलं गेलेलं आहेत आणि हे ठिकाण UNESCO वारसा स्थळांच्या यादीत देखील समाविष्ट आहे. हे ठिकाण कठोर परिश्रम आणि सभ्यतेचा नमुना आहे असं तेथील पर्यटन फलकावर लिहिलेलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या