JOIN US
मराठी बातम्या / विदेश / बुलेटप्रुफ स्मार्टफोन! लुटारूंनी मारली गोळी, पण मोबाईलने वाचवला जीव

बुलेटप्रुफ स्मार्टफोन! लुटारूंनी मारली गोळी, पण मोबाईलने वाचवला जीव

दीवार सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या (A man’s life saved by mobile phone) सीनची आठवण यावी, असा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चनला गोळी लागूनही त्याचा जीव वाचतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्राझीलिया, 14 ऑक्टोबर : दीवार सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या (A man’s life saved by mobile phone) सीनची आठवण यावी, असा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चनला गोळी लागूनही त्याचा जीव वाचतो. कारण त्याच्या खिशात एक नाणं असतं. 786 नंबरच्या या नाण्यामुळे गोळी त्याच्या छातीपर्यंत पोहोचत नाही आणि त्याचा जीव वाचतो, हा प्रसंग कमालीचा लोकप्रिय झाला होता. अशीच एक घटना (Bullet hit on mobile in the pocket) प्रत्यक्षात घडली असून यावेळी नाण्याऐवजी स्मार्टफोनमुळे व्यक्तीचा जीव वाचला आहे. लुटारूंनी केला गोळीबार ब्राझीलमध्ये पेरनाम्बुको शहरात लुटारूंनी गोळीबार केला. यात एका नागरिकाला गोळी लागली. त्यानंतर लुटारू तिथून पसार झाले. या रुग्णाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र जेव्हा डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली, तेव्हा त्याला गोळी लागलीच नसल्याचं डॉक्टरांना दिसून आलं. त्यामुळे डॉक्टरही काही क्षण चक्रावले. थोड्या वेळातच त्याला गोळी न लागण्याचं खरं कारण समोर आलं. मोबाईलने वाचवला जीव या व्यक्तीच्या शर्टच्या खिशात मोटोरोलाचा मोबाईल होता. लुटारूंनी मारलेली गोळी त्याच्या मोबाईलला लागली. यात मोबाईलची काच फुटली, मात्र गोळी मोबाईलमध्येच अडकली. मोबाईल पार करून ही गोळी व्यक्तीच्या छातीपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे त्याचे प्राण वाचले. ‘डेली मेल’ने दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात रुग्णाला किरकोळ जखमा झाल्या आहेत, मात्र गोळी छातीत न घुसल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. हे वाचा - OMG…लेकाची करामती आईच्या अंगाशी, बोलवावं लागलं थेट अग्निशमन दलाला डॉक्टरांनी शेअर केले फोटो या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याचे फोटो शेअर केले असून त्यात मोटोरोलाचा मोबाईल, त्याचा फुटलेला स्क्रीन आणि पाठिमागचा काहीही न झालेला भाग यांचे फोटो  शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्तानं आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या