लास व्हेगास, 08 फेब्रुवारी: तुम्ही कुठेही असलात तरी तुमचं नशीब तुम्हाला शोधून काढतंच, असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. घरातील ज्येष्ठ नेहमी नशिबाबाबत असं विधान करतात. पण नवी पिढी या गोष्टी गांभीर्याने न घेता मेहनत करण्यावर विश्वास ठेवते. परंतु नशिबाबद्दलचं हे वाक्य अमेरिकेतील एका व्यक्तीबाबत पूर्णपणे खरं ठरलंय. अमेरिकेतील एका व्यक्तीला असा जॅकपॉट (American man won jackpot) मिळाला आहे, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. या व्यक्तीने कॅसिनोमध्ये 1.64 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला होता परंतु मशीनच्या चुकीमुळे याबद्दल कोणालाच कळले नाही. जेव्हा कॅसिनो व्यवस्थापनाने त्याची चौकशी केली तेव्हा विजेत्याचे नाव रॉबर्ट टेलर (Robert Taylor) असल्याचे समोर आले. पण रॉबर्टबद्दल कोणालाच माहिती मिळत नसल्याने आता कसं करायचं, हा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर, कॅसिनो बोर्डाने त्यांच्या अथक प्रयत्नांनी दोन आठवड्यांनंतर या रॉबर्ट टेलरला शोधून काढले आणि त्याला जॅकपॉट लागल्याची माहिती दिली. हे वाचा- शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत हा प्रकार अमेरिकेतील (America) लास व्हेगसमधील एका कॅसिनोमध्ये घडला. रॉबर्ट टेलर नावाच्या व्यक्तीने 1.64 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे. पण, त्या व्यक्तीशी संपर्क होत नाही. ते त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. त्याचा नंबर किंवा पत्ता माहीत नव्हता, असे नेवाडा गेमिंग कंट्रोल बोर्डाने शुक्रवारी जाहीर केले. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, टेलर 8 जानेवारी रोजी ट्रेझर आयलँड हॉटेल कॅसिनोमध्ये जॅकपॉट खेळला होता. विजेत्याची घोषणा होत असताना स्लॉट मशीनमध्ये त्रुटी आढळली. त्रुटी सुधारल्यानंतर रॉबर्ट टेलरने जॅकपॉट जिंकल्याचे समजले. पण आता अडचण अशी होती की जॅकपॉटचा विजेता रॉबर्ट कोण आहे आणि तो कुठला आहे, याबद्दल काहीच माहिती नव्हती. तर, या रॉबर्टचा शोध घेण्यासाठी बोर्डाच्या तपास पथकाने तिकीट विक्रीचे रेकॉर्ड तपासले. त्या दिवशी तिथं आलेल्या लोकांना विचारले. त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज शोधले, अशाप्रकारे शेवटी रॉबर्टची ओळख पटली. बोर्डाच्या तपास पथकाला दोन आठवड्यांनंतर विजेता रॉबर्ट टेलर सापडला. 28 जानेवारीला जेव्हा टेलरला याची माहिती मिळाली तेव्हा त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही. आता फेब्रुवारीमध्ये तो ही रक्कम स्वीकारणार आहे. हे वाचा- बाळाच्या शरीरावर दिसल्या ‘जीवघेण्या खुणा’, डॉक्टरचं निदान ऐकून बसला धक्का बोर्डाचे प्रमुख जेम्स टेलर म्हणाले, “गेमिंग उद्योगावर जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी मी तपास पथकाचे कौतुक करतो. त्यांनी दोन आठवड्यांत अनेक तास घालवून आणि आमच्या विजेत्याला शोधलं आणि त्याचा जॅकपॉट त्याला देण्यात येईल. या कृत्याने लोकांचा कॅसिनोवरील विश्वास वाढला आहे,” असं त्यांनी सांगितलं.