टोकियो, 15 जानेवारी : दैनंदिन जीवनात एखादी वस्तू आपल्याला हवी असेल आणि ती खरेदी करणं शक्य नसेल, तर ती वस्तू भाडेतत्त्वावर (Rent) मिळते का याचा शोध आपण घेतो. तसं पाहायला गेलं तर बहुतांश आवश्यक गोष्टी आता भाडेतत्त्वावर मिळू शकतात. त्यातून भौतिक सुख मिळू शकतं. पण मनातल्या गोष्टी, सुख, दुःख शेअर करण्यासाठी एकही गोष्ट बाजारात मिळत नाही. जवळचा माणूस नसेल तर मनातल्या गोष्टी शेअर (Share) करणं काहीसं अवघड असतं. पण जपानमधल्या (Japan) बहुतांश लोकांची ही समस्या सुटली आहे. जपानमध्ये एक व्यक्ती लोकांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध आहे. हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण ही गोष्ट खरी आहे. शोजी मोरिमोटो (Shoji Morimoto) असं या व्यक्तीचं नाव असून, जपानमधले अनेक अनोळखी लोक शोजी यांना भाडेतत्त्वावर घेतात आणि त्याच्या सोबत वेळ घालवतात. शोजी मोरीमोटी हे जपानची राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) राहतात. शोजी यांनी ओसाका विद्यापीठातून भौतिक शास्त्राची (Physics) पदवी घेतली आहे. एका वृत्तानुसार शोजी यांना कोणीही काही काळासाठी भाडेतत्त्वावर घेऊन जाऊ शकतं. यासाठी शोजी 10,000 येन चार्ज आकारतात. ज्या व्यक्तीनं शोजी यांना भाडेतत्त्वावर घेतलं आहे. ती व्यक्ती शोजी यांच्यासोबत जेवण करू शकते आणि मनमोकळा संवाद (Communication) साधू शकते. सुरुवातीला शोजी ही सेवा निःशुल्क देत होते. परंतु काही काळानंतर त्यांनी ``मी स्वतःला भाडेतत्त्वावर ऑफर करतोय. एकटा माणूस काही कामं करू शकत नाही. एकट्याला दुकानात जाणं अशक्य आहे का? तुम्ही तुमचा सहकारी गमावला आहे का? मी या सोप्या कामांसाठी भाडेतत्त्वावर सेवा देतो.``, अशी पोस्ट व्टिटरवर टाकली होती. जी लोक उच्चभ्रू भागात राहतात ती जास्त जगतात, संशोधनाचा असाही दावा शोजी मोरीमोटी यांना भेटणाऱ्या बहुतांश व्यक्ती अशा असतात की खासगी आयुष्यात त्यांच्याशी संवाद साधणारं कोणीही नसतं किंवा या व्यक्तींमध्ये घटस्फोट (Divorce) झालेल्यांचाही समावेश असतो. मात्र, शोजी हे विवाहित आहेत. अनेक व्यक्ती अशा असतात की स्वतःचा कंटाळा दूर करण्यासाठी त्या शोजी यांना कामावर ठेवतात किंवा भाडेतत्त्वावर घेतात. `मी शोजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मला त्यांची सोबत खूप आवडली`, अशी प्रतिक्रिया एका क्लायंटने दिली होती. या कामाबाबत प्रतिक्रिया देताना शोजी मोरीमोटो म्हणतात, की `मी लोकांचा एकटेपणा आणि भावना समजू शकतो. त्यामुळे मी हे काम करतो`.