नवी दिल्ली 08 मे : ज्या वयात मुलं आपल्या मैत्रिणींसोबत खेळतात, काहीतरी नवीन शिकून समाजात रुजण्याच्या वयात येतात, त्या वयात एक मुलगी घरात कैद झाली आहे. याचं कारण म्हणजे मुलीचा आजार. जो घरातून बाहेरच्या जगात येताच तिला प्रचंड वेदना आणि अस्वस्थता देऊ लागतो (7 Year Old Girl Never Goes Outside) दोन क्वार्टर दारू पिऊनही नशा चढेना; वैतागून थेट गृहमंत्र्यांकडेच केली तक्रार, अन् मग.. एथेना कूपर नावाची 7 वर्षांची मुलगी सामान्य मुलांसारखीच दिसते, परंतु ती तिच्या मित्रांसोबत बाहेर खेळू शकत नाही किंवा त्यांच्यासोबत पोहायला आणि इतर कोणतीही मस्ती करायला जाऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे मुलीचा अर्टिकेरिया (Urticaria). या आजाराने (Rare Disease) तिचं आयुष्यच अगदी काही सीमांमध्ये बांधून ठेवलं आहे. यामुळे जास्तीत जास्त ती शाळेत जाऊन अभ्यास करू शकते, पण बाहेर खेळायला जाऊ शकत नाही.
एथेनाच्या या दुर्मिळ आजाराचा परिणाम वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दिसून येऊ लागला. तिच्या अंगावर भयानक पुरळ उठू लागले. मिररच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एथेनाला डॉक्टरांनी सांगितलं की, तिला बदलत्या तापमानाची अॅलर्जी आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तापमान वाढलं तरी आणि कमी झालं तरी तिला ऍलर्जी होते. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडताच तिला त्रास होऊ लागतो. उन्हाळ्यात तिला पाण्यात खेळता येत नाही, घराबाहेर फिरायलाही जाता येत नाही. कालांतराने हा आजार इतका वाढला की तापमानात थोडासा बदल होताच एथेनाच्या शरीरावर लाल पुरळ उठू लागले. शाळेत न येता फुकटाचा पगार घेत होती मुख्याध्यापिका, 5000 रुपयांत एका मुलीला ठेवलं; असं समोर आलं प्रकरण मुलीला फुटबॉल, पोहणे यांसारख्या खेळांची आवड आहे, परंतु तिच्या आजारपणामुळे ती काहीही खेळू शकत नाही. तिला आईस्क्रीम खाण्यासही मनाई आहे, कारण यामुळेही तिला पुरळ उठते. चिमुरडीचं संपूर्ण बालपण घरातच जात आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, तिला दररोज सकाळी हे पुरळ येतात, नंतर ते जास्त वाढू नयेत यासाठी ते प्रयत्न करू लागतात. ती शारीरिकदृष्ट्या ठीक आहे, परंतु ती कोणतीही अॅक्टिव्हिटी करू शकत नाही. तिची भावंडं तिच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि ही चिमुकली स्वतःही आता तिची परिस्थिती समजून घेते आणि तसंच वागते. आई-वडिलांचं म्हणणेंआहे की ते अशा उपचाराच्या शोधात आहेत जे त्यांच्या मुलीला सामान्य जीवन देऊ शकेल.