JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / अरे ही तर Rapunzel! 23 वर्षात एकदाही लावली नाही केसांना कात्री, आता पायापर्यंत पोहोचतात घनदाट केस, पाहा PHOTOS

अरे ही तर Rapunzel! 23 वर्षात एकदाही लावली नाही केसांना कात्री, आता पायापर्यंत पोहोचतात घनदाट केस, पाहा PHOTOS

रशियामध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय अँजेलिका बारानोव्हाचे (Russia Anzhelika Baranova) सुंदर केस पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे तिचे खरे केस आहेत. अँजेलिकाचा दावा आहे की, तिला गेल्या 23 वर्षांपासून तिने केसांना कात्री लावलेली नाही.

0107

बऱ्याचदा मुलींना केसांच्या समस्यांबद्दल काळजी वाटते, परंतु रशियाच्या इर्कुत्स्क येथील रहिवासी असलेल्या अँजेलिकाचे केस तिच्या टाचांपर्यंत पोहोचतात. तिने केस न कापण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती फक्त 5 वर्षांची होती. तेव्हापासून ना तिने तिचे केस कापले, ना त्याच्या पालकांनी तिच्या केसांना कात्री लावली.

जाहिरात
0207

20 वर्षांत, तिच्या केसांची लांबी इतकी वाढली आहे की त्यात तिचे संपूर्ण शरीर व्यापून जाते. तिला तिच्या लांब केसांचा अभिमान आहे, जरी ती त्याची काळजी घेण्यासाठी जास्त काही करत नाही. अँजेलिका म्हणते की ती तिच्या केसांवर जास्त मेहनत घेत नाही.

जाहिरात
0307

अँजेलिका आठवड्यातून दोनदा आपले केस धुवते, विशेष शॅम्पू आणि कंडिशनरशिवाय. मोकळ्या हवेत केस सुकू दिल्यानंतर, केसांवर कंंगवा फिरवते जेणेकरून त्यात गुंता होऊ नये.

जाहिरात
0407

Caters News शी बोलताना तिने सांगितले की केस विंचरताना तिला खूप काळजी घ्यावी लागते, कारण गुंता झाल्यास ते जास्त तुटतात. 28 वर्षीय अँजेलिका व्यवसायाने परिचारिका आहे आणि तिच्या केसांची काळजी घेणे तिच्यासाठी खरोखरच आव्हानात्मक आहे.

जाहिरात
0507

अँजेलिका हे देखील मान्य करते की हे केस सांभाळणे कधीकधी कठीण होते. पण त्या बदल्यात तिला मिळणारी प्रशंसा तिला खूप आनंदित करते. तिचे कुटुंब आणि आजुबाजूचे लोक तिला सांगतात की तिचे केस किती सुंदर आहेत आणि यामुळे तिच्या उत्साहात भर पडते.

जाहिरात
0607

28 वर्षीय रशियन ब्यूटी असं म्हणते की ती भविष्यातही केस कापण्याची योजना आखत नाही आहे. तिला तिच्या लांब केसांसह फोटो काढणं देखील आवडतं. तिने इन्स्टाग्रामवर फोटोशूट सुद्धा शेअर केले आहे.

जाहिरात
0707

ज्या सोप्या पद्धतीन ती तिचे केस हाताळते त्यानुसार हेच म्हणता येईल की तिचे सुंदर केस निसर्गाची एक अद्भुत भेट आहे. (All Photos- Instagram/@lik_anzhelik)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या