एडिनबर्ग, 28 मे : गुपचुप पॉर्न फिल्म (Porn Films) किंवा व्हिडिओ पाहण्याची सवय अनेकांना असते. पॉर्न फिल्म पाहण्याच्या सवयीमुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपल्या देशात पॉर्न साइट्सवर (Porn Sites) बंदी घालण्यात आली आहे. स्कॉटलंडमधल्या (Scotland) 22 वर्षांच्या एका तरुणीला मात्र पॉर्न फिल्मच्या अनुषंगाने मोठा फायदा झाला आहे. या तरुणीला चक्क पॉर्न फिल्म पाहण्याची नोकरी (Jobs) मिळाली आहे. 90 हजार उमेदवारांना मागे टाकत या तरुणीने हा जॉब मिळवला आहे. ऐकायला काहीसं विचित्र वाटत असलं, तरी ही महिला सध्या या जॉबमुळे जोरदार चर्चेत आहे. `ही एक उत्तम संधी आहे,` असं ही महिला सांगते. `लेटेस्टली डॉट कॉम`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्कॉटलंडमधल्या ग्रीनॉक (Greenock) इथल्या रेबेका डिक्सन (Rebecca Dickson) या महिलेला संशोधनासाठी पॉर्न फिल्म्स पाहण्याची नोकरी मिळाली आहे. Bedbible या कंपनीची पॉर्न रिसर्च प्रमुख (Porn Research Head) म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी 90 हजारांहून अधिक अर्ज आले होते; पण रेबेका हा जॉब मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, `आम्हाला पॉर्न इंडस्ट्रीविषयी चांगली माहिती असलेल्या व्यक्तीची गरज होती. आम्ही अशा व्यक्तीला पॉर्न पाहाण्यासाठी पगार देणार होतो. पॉर्न रिसर्चची प्रमुख म्हणून रेबेका डिक्सनला पॉर्नच्या अनुषंगाने सेक्स पोझिशन, वेळ, ऑरगॅझमची संख्या, स्त्री-पुरुष गुणोत्तर, केसांच्या रंगाचं डिस्ट्रिब्युशन आणि भाषेचं डिस्ट्रिब्युशन यासारख्या गोष्टींविषयी संशोधन करून अधिकाधिक माहिती मिळवायची आहे.`
Menstrual Hygiene Day: पॅड, टॅम्पन किंवा कप तुमच्यासाठी आरोग्यदायी कोणतं? डॉक्टर म्हणतात..
`रेबेकाला आम्ही पसंती दिली आहे. ती खुल्या विचारांची आहे आणि जगातल्या पहिल्या सखोल पॉर्न आकडेवारीचा भाग होण्यासाठी ती प्रेरित आहे. तिनं तिच्या नोकरीसाठी अर्जात नमूद केल्याप्रमाणे, `तिला या कक्षेच्या बाहेर पडून विविध श्रेणींचा शोध घ्यायला आणि एक्सप्लोअर करायला आवडतं.` या नोकरीसाठी अशाच गुणांची आवश्यक आहे. आम्ही केवळ अशा व्यक्तींसोबत काम करतो जे या विषयाबद्दल पूर्णपणे पॅशनेट (Passionate) आहेत,` असं Bedbibleचे सहसंस्थापक जेकब बॅगर यांनी सांगितलं. `मी पाहिलं आणि मला वाटलं की हा फक्त एक आयडियल जॉब (Ideal Job) आहे, कोणाला पॉर्न पाहण्यासाठी पैसे मिळवायचे नसतील? माझी या नोकरीसाठी निवड झाल्याचं पाहून मला खूप आश्चर्य वाटत आहे. कारण मी एका छोट्या शहरात राहते. या शहरात फारसं काही घडत नाही. त्यामुळे ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे आणि मला या प्रकल्पाचा एक भाग होताना आनंद होत आहे,` असं रेबेका डिक्सन हिनं सांगितलं.