महाविकास आघाडीच्या काळात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नुकताच सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले होते मात्र सीबीआयनं या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल कोर्टाला सादर केला आणि कोर्टानं तो स्वीकारलाय. त्यावरून विरोधकांनी सीबीआयच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. तसेच सरकारवरही टीकेची झोड उठवलीय.