काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir ranjan choudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi murmu) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपने काँग्रेस पक्षाला संसदेत घेरले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.