आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही सिंधूंनंतर भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं सनसनाटी विजयाची नोंद करत बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावलं. लक्ष्य सेननं अंतिम सामन्यात मलेशियाच्या झी यंगचं कडवं आव्हान तिसऱ्या सेटमध्ये मोडीत काढलं.