खेडमधील अंजनी ते चिपळूण या स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे गेल्या एक ते तास दीड तासापासून कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. खेडमधील स्थानकामध्ये मांडवी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. गेल्या एक तासापासून ही एक्सप्रेस या ठिकाणी रखडलेली आहे.