एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडलेल्या सुनावणीत शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आणि दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले आहे. या प्रकरणावर आता 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.