JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / Air India च्या विमानात ऐकू आला रतन टाटांचा आवाज, म्हणाले…

Air India च्या विमानात ऐकू आला रतन टाटांचा आवाज, म्हणाले…

एअर इंडिया कंपनीच्या विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकतंच एक सरप्राईज मिळालं. विमानात त्यांना एक आवाज ऐकू आला. हा आवाज होता खुद्द रतन टाटा यांचा.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी: ‘एअर इंडिया’च्या (Air India) विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (Passengers) नुकतंच एक सरप्राईज (Surprise) मिळालं. विमान प्रवास सुरू होण्यापूर्वी त्यांना विमानात एक आवाज (Audio Clip) ऐकू आला. आवाज ऐकताच सर्वांना समजलं की हा तर साक्षात रतन टाटा (Ratan Tata) यांचा आवाज आहे. सरकारकडून एअर इंडिया कंपनी खरेदी केल्यानंतर या कंपनीच्या विमानानं प्रवास करणाऱ्यांचं रतन टाटांनी अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं. मूळची टाटांची असणारी ही कंपनी 69 वर्षांनी पुन्हा टाटांकडे आली आहे.  

संबंधित बातम्या

काय म्हणाले रतन टाटा? रतन टाटा यांच्या आवाजातील एक क्लिप प्रवाशांना ऐकवण्यात आली. ही क्लिप त्यानंतर सोशल मीडियावरही प्रसारित करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या नव्या ग्राहकांचं टाटा सन्सकडून हार्दीक स्वागत. आपली सेवा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आराम आणि सुविधा याबाबतीत एअर इंडिया ही ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीची विमान कंपनी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा संदेश रतन टाटांनी विमानात बसलेल्या प्रवाशांना दिला. एअर इंडियाच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरही हा संदेश शेअर करण्यात आला आहे. हे वाचा -

खरेदीची औपचारिकता पूर्ण भारत सरकारकडून एअर इंडिया कंपनी टाटा ग्रुपच्या ताब्यात येण्याची औपचारिकता गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली. 69 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा सन्सच्या मालकीची झाली आहे. 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना झाली होती. 1946 साली या कंपनीचं नाव बदलून ते एअर इंडिया असं करण्यात आलं. 1953 साली केंद्र सरकारनं या कंपनीचा ताबा घेतला होता. मात्र 1977 सालापर्यंत जेआरडी टाटा हेच या कंपनीचे चेअरमन होते. गेल्या आठवड्यातील गुरुवारी भारत सरकारनं ही कंपनी पुन्हा टाटा सन्सच्या नावे केली आणि खरेदी-विक्रीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली. 18 हजार कोटी रुपयांची बोली लावून टाटा परिवारातील टेलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं एअर इंडियाची मालकी मिळवली आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या