Manali Flying Dining Restaurant : फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटचे मालक दमन कपूर यांनी सांगितलं की, त्यांनी मनालीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून 2250 मीटर उंचीवर रेस्टॉरंट तयार केलं आहे. 170 फूट उंचीवर 24 लोक एकत्र बसून जेवण करू शकतात.
कल्पना करा, मनालीमध्ये 170 फूट उंचीवर आपण बसलेले असू आणि समोर जेवणाचे ताट असेल. हवेतील अन्नाची चव काही वेगळी असेल का? हिमाचल प्रदेशातल्या मनालीमध्ये असंच एक रेस्टॉरंट उघडलं आहे. इथे लंच आणि डिनरचा आनंद हवेत तरंताना घेता येतो.
खरं तर, हे देशातील तिसरं आणि हिमाचलचं पहिलं फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट मनालीमध्ये सुरू झालं आहे. इथे खाण्यासोबतच पर्यटकांना 170 फूट उंचीवरून डोंगरदऱ्यांचं सौंदर्यही पाहता येतं.
मनालीमध्ये तयार करण्यात आलेल्या या फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटवर सुमारे 9 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. इथे एका वेळी 24 लोक हवेत बसून स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.
हिमाचलचे शिक्षण मंत्री आणि मनालीचे आमदार गोविंद ठाकूर म्हणाले की, रेस्टॉरंटमुळे हिमाचलमधील पर्यटनाला चालना मिळेल.
ओल्ड मनालीजवळ बांधलेल्या या रेस्टॉरंटचं उद्घाटन शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांच्या हस्ते झालं.
जेवणादरम्यान पर्यटकांना उंचावरून रानीसुई, इंद्रा किल्ला, हमता आणि रोहतांगच्या टेकड्याही पाहता येतील.
यापूर्वी अशा प्रकारची रेस्टॉरंट गोवा आणि नोएडामध्ये होती आणि आता ते मनालीमध्येही सुरू झालं आहे. मंत्री म्हणाले की, लवकरच रोहतांग खिंडीवर व्यास ऋषींचा पुतळाही बांधला जाईल.
फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटचे मालक दमन कपूर यांनी सांगितलं की, त्यांनी मनालीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून 2250 मीटर उंचीवर एक रेस्टॉरंट तयार केलं आहे. 170 फूट उंचीवर 24 लोक एकत्र बसून जेवण करू शकतात.
दमन कपूर यांनी सांगितलं की, प्रति व्यक्ती लंच किंवा डिनरसाठी 3999 रुपये द्यावे लागतील. हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि एका राइडसाठी 50 कोटी रुपयांचं विमा संरक्षण देखील आहे. या सुविधेतून सुमारे 40 तरुणांना रोजगारही मिळत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, ऑर्डर सुरुवातीलाच करता येईल आणि नंतर मध्येच हवेत काहीही ऑर्डर करता येणार नाही.