हॉंगकॉंग, 1 फेब्रुवारी: आपल्या मांजरांना (Cats) प्रवासात सोबत नेता यावं, यासाठी एका कुटुंबानं (Family) कोट्यवधी रुपये (Millions) खर्च करून प्रायव्हेट जेट (Private Jet) बुक केल्याची घटना समोर आली आहे. हॉँगकाँगमध्ये (Hongkong) सध्या कोरोनासाठीचे (Corona) कडक निर्बंध (Regulations) लागू आहेत. त्यामुळे सध्या प्राण्यांना विमानातून किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीननं ‘झिरो कोरोना’ धोरण अंगिकारलं असून अत्यंत काटेकोर नियमांचं पालन करण्यात येत आहे. त्यामुळेच एका प्राणीप्रेमी कुटुंबाला प्रवास करताना सोबत मांजरांना नेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले. नियम झाले कडक एकेकाळे विमानांचं हब म्हणून ओळख असणाऱ्या हाँगकाँगमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर विमानं रद्द होणं आणि प्रवासी अडकून पडणं ही नित्याचीच बाब झाली आहे. हाँगकाँगमधून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या एका कुटुंबाला याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे. सध्याच्या नियमांनुसार प्रवासी विमानातून कुठल्याही प्रकारचे प्राणी नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना आपल्या प्राण्यांना माघारी सोडूनच नागरिक देश सोडत आहेत. एकतर या प्राण्यांना ओळखीच्या व्यक्तींकडे सोपवणं किंवा त्यांना तसंच रामभरोसे सोडून निघून जाणं हे दोनच उपाय देश सोडणाऱ्यांपुढे आहेत. पैशांचा सदुपयोग आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन जायचं असेल तर प्रायव्हेट जेटशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नागरिकांपुढे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे श्रीमंत आहेत, असेच नागरिक प्राण्यांना घेऊन जाऊ शकतात. आपल्याकडे सुदैवाने पैसे असल्यामुळेच आपण आपल्या दोन मांजरांना घेऊन जाऊ शकलो, अशी प्रतिक्रिया ली नावाच्या नागरिकाने दिली आहे. हे वाचा -
एवढा आला खर्च दोन पाळीव प्राण्यांसह प्रायव्हेट जेटचा वापर करण्यासाठी ली कुटुंबीयांना 23,100 डॉलर एवढा खर्च आला. भारतीय चलनात ही रक्कम साधारण 17 लाख 26 हजार रुपये एवढी होते. आतापर्यंत अशा प्रकारचा खर्च करून न शकल्यामुळे प्राण्यांना सोडून अनेक नागरिक परदेशी गेले आहेत. त्यामुळे 3000 ते 4000 प्राणी अडकून पडल्याची माहिती ऍनिमल ट्रॅव्हल कंपनी असणाऱ्या ‘पेट हॉलिडे’नं दिली आहे.