आता तुम्ही कोणत्याही दिवशी राष्ट्रपती भवनात जाऊ शकता, पण त्याआधी तुम्हाला नोंदणी करावी लागेते. ज्यामध्ये राष्ट्रपती भवनात येणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. राष्ट्रपती भवन तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. तुम्ही बुकिंग करून यापैकी फक्त एका भागाला भेट देऊ शकता.
राष्ट्रपती भवनाच्या तीन भागांना सर्किट 1, सर्किट 2 आणि सर्किट 3 अशी नावे देण्यात आली आहेत. त्याशिवाय तुम्ही दर शनिवारी सकाळी 8 वाजता होणाऱ्या चेंज ऑफ गार्ड सोहळ्याचे बुकिंग देखील करू शकता. सर्किट 1 मध्ये अशोका हॉल आहे जिथे सर्व पुरस्कार सोहळे होतात, दरबार हॉल, नॉर्थ ड्रॉइंग रूम आणि लाँग ड्रॉईंग रूम इ. तर सर्किट 2 मध्ये राष्ट्रपती भवनाचे संग्रहालय संकुल आहे. त्याच वेळी सर्किट 3 मध्ये राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बुक करू शकता.
1911 मध्ये ब्रिटिशांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. यानंतर 1912 मध्ये रायसीना येथे ‘व्हाईसरॉय हाऊस’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी चार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. यामुळे व्हाईसरॉय हाऊस बांधण्यासाठी चार वर्षांऐवजी 19 वर्षे लागली.
या इमारतीचे मुख्य शिल्पकार ‘एडविन लँडसीर लुटियन्स’ होते. 23 जानेवारी 1931 रोजी याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ‘भारताचे व्हाइसरॉय’ लॉर्ड आयर्विन येथे राहायला आले. सन 1950 पर्यंत याला ‘व्हाईसरॉय हाऊस’ असेच म्हणायचे नंतर या भागाचे नाव लुटियन्स ठेवण्यात आले.
राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी तुम्हाला 50 रुपये खर्च करावे लागतील. प्रति व्यक्ती 50 रुपये प्रवेश शुल्क असून लहान मुलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तुम्ही राष्ट्रपती भवनाला भेट देऊ शकता.
सर्व प्रथम तुम्हाला rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour वेबसाइटवर जावे लागेल आणि नंतर मेनूमधून ‘Plan Your Visit’ पर्याय निवडा.
यानंतर, तुम्हाला ज्या भागाला भेट द्यायची आहे त्या भागाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला ज्या दिवशी जायचे आहे ती तारीख देखील निवडावी लागेल.
यानंतर राष्ट्रपती भवनात येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी देऊन प्रवेश शुल्क भरले की झालं तुमचं बुकींग. सोपं आहे की नाही? मग कधी देताय भेट आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.