JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp मध्ये होणार मोठे बदल, नव्या अपडेटनंतर हटवले जाणार महत्त्वाचे फीचर्स

WhatsApp मध्ये होणार मोठे बदल, नव्या अपडेटनंतर हटवले जाणार महत्त्वाचे फीचर्स

सोशल मीडिया आणि मेसेजिंग App WhatsApp वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवे अपडेट्स, फीचर्स देत असतं. अनेकदा WhatsApp वर नवे फीचर्स अपडेट होत असतात, परंतु आता WhatsApp ने आपल्या अपडेटमध्ये काही फीचर्स हटवण्याची माहिती दिली आहे.

0108

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp आपल्या नव्या अपडेटमध्ये App च्या होम पेजवरुन काही फीचर्स हटवणार आहे.

जाहिरात
0208

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप चॅट लिस्टमधून (WhatsApp Chat list) मधून ब्रॉडकास्ट लिस्ट (Broadcast List) आणि न्यू ग्रुप (New Group) ऑप्शन्स हटवले जाणार आहेत. सध्या हे ऑप्शन्स स्क्रिनवर सर्वात वर उजव्या कोपऱ्यात दिले गेले आहेत.

जाहिरात
0308

चॅट स्क्रिनवर सर्वात वर असलेली आर्काइव लिस्ट सोडून WhatsApp Broadcast list आणि New Group ऑप्शन्स तिथून हटवणार आहे.

जाहिरात
0408

Chat List अधिक योग्यरित्या दिसण्यासाठी यूआय एलेमेंट्स (UI Elements) हटवणं गरजेचं आहे आणि अशात हे ऑप्शन्स हटवणं एक पर्याय आहे.

जाहिरात
0508

ब्रॉडकास्ट लिस्टच्या मदतीने युजर WhatsApp वर एकच मेसेज एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. तो मेसेज सारखा फॉरवर्ड करण्याची गरज नसते. रिपोर्टनुसार, हा ऑप्शन स्क्रिनवरुन हटवल्यानंतर WhatsApp यासाठी एक नवा एन्ट्री पॉईंट देणार आहे.

जाहिरात
0608

हा ऑप्शन अॅक्सेस करण्यासाठी युजरला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जावं लागेल आणि इथे Start New Chat या ऑप्शनसह नवा ऑप्शनही दिसेल.

जाहिरात
0708

नवा ग्रुप बनवण्यासाठी New Group चा जो ऑप्शन हटवला जाणार आहे, तोदेखील अॅक्सेस करण्यासाठी युजर्सला कॉन्टॅक्ट लिस्टमध्येच जावं लागेल.

जाहिरात
0808

WhatsApp चे हे नवे अपडेट्स आता येणार नसून यावर सध्या काम चालू आहे. तसंच नवं अपडेट कधी रोलआउट होणार याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या