JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मोठी बातमी! 31 मार्चनंतर 'या' Android आणि iOS फोनमध्ये बंद होणार WhatsApp; बघा यादी

मोठी बातमी! 31 मार्चनंतर 'या' Android आणि iOS फोनमध्ये बंद होणार WhatsApp; बघा यादी

काही अँड्रॉईड (Android), आयओएस (iOS) आणि कायओएस (KaiOS) व्हर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

जाहिरात

बँक अकाउंट हटवायचं असल्यास सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Payment पर्यायावर क्लिक करा. आता बँक अकाउंटची एक लिस्ट दिसेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च:  मेसेजेसची देवाण-घेवणा करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोंचीही (Photos) अगदी सहजपणे देवाण-घेवाण करता येते. मेटाची (Meta) ही मेसेजिंग सेवा आपल्या अ‍ॅपमध्ये सतत नवनवीन बदल करत आहे. आता वार्षिक अपडेट म्हणून व्हॉट्सअ‍ॅपनं काही जुन्या अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोन मॉडेल्समध्ये आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपासून काही अँड्रॉईड (Android), आयओएस (iOS) आणि कायओएस (KaiOS) व्हर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या FAQ वेबसाईटवर यााबाबत माहिती दिली आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 31 मार्चनंतर, आयओएस 10 किंवा त्यापुढील व्हर्जन असणाऱ्या आयफोन्समध्येच (iPhone) व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. अ‍ॅपल सध्या आयओएस 15 विकत आहे, जे तीन ते चार वर्षे जुन्या आयफोनशी सुसंगत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्सला जेलब्रोकन आयफोन न वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय 4.1 (Android 4.1) किंवा त्यापूर्वीचे व्हर्जन असलेल्या अँड्रॉईड फोनमध्येसुद्धा व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. तुमचं व्हॉट्सअ‍ॅप खातं व्हॅलिडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक फोन नंबर किंवा एसएमएस नंबर असणं गरजेचं आहे. जर तुमचा स्मार्टफोन कायओएस (KaiOS) प्लॅटफॉर्म सपोर्टेड असेल तर, त्यावर व्हॉट्सअ‍ॅप सुरू राहण्यासाठी फोनमध्ये कायओएस 2.5 किंवा त्यानंतरचं व्हर्जन असणं आवश्यक आहे. जिओ फोन (JioPhone) आणि जिओ फोन 2 (JioPhone 2) या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू राहील तर शाओमी (Xiaomi), सॅमसंग (Samsung), एलजी (LG) आणि मोटोरोला (Motorola) या कंपन्यांच्या काही स्मार्टफोन्समध्ये 31 मार्चनंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं जाणार आहे. महिला सुरक्षेसाठी Network 18-Truecaller च्या वतीनं आज ‘द कॉल इट आउट कॉनक्लेव्ह’ आपलं अ‍ॅप नवीन तंत्रज्ञानासह अधिक गतीनं चालावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नियमितपणे अपडेट आणत असतं. त्यामुळे काही जुन्या अँड्रॉईड आणि आयओएस व्हर्जन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणं बंद होणार आहे. खालील अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद 1) शाओमी - शाओमी हाँग एमआय (Xiaomi HongMi), एमआय 2a, एमआय2s, रेडमी नोट 4G आणि हाँग एमआय 1s. 2) एलजी - एलजी ऑप्टिमस F7, एलजी ऑप्टिमस L3 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F5, एलजी ऑप्टिमस L5 II, एलजी ऑप्टिमस L5 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L3 II, एलजी ऑप्टिमस L7 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L7 II, एलजी ऑप्टिमस F6, एलजी एनॅक्ट, एलजी ऑप्टिमस L4 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F3, एलजी ऑप्टिमस L4 II, एलजी ऑप्टिमस L2 II, एलजी ऑप्टिमस F3Q. 3) सॅमसंग - सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट, गॅलेक्सी S3 मिनी, गॅलेक्सी एक्स कव्हर 2 आणि गॅलेक्सी कोअर. 4) ह्युवाई - ह्युवाई Ascend D, क्वाड XL, ह्युवाई Ascend D1, अॅक्सेंड P1 S. 5) मोटोरोला - मोटोरोला Droid Razr. व्हॉट्सअ‍ॅप बंद होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी मोठी आहे. याचा लाखो युजर्सना फटका बसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या