इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp सतत नवे अपडेट देत आहे. आता WhatsApp ने आणखी एक फीचर दिलं असून याच्या मदतीने युजर्स मेसेजला Quick Reply करू शकतील.
हे फीचर केवळ बिजनेस अकाउंट वापरणाऱ्या युजर्ससाठीच उपलब्ध होणार आहे. युजर्सला चांगली सर्विस आणि सतत येणाऱ्या मेसेजेला सहजपणे रिप्लाय करण्यासाठी WhatsApp ने हे फीचर लाँच केलं आहे.
Quick Reply फीचरचा वापर करुन सतत मेसेज करणाऱ्यांना कीबोर्ड शॉर्टकटचा वापर करुन काही सेकंदात रिप्लाय करता येईल.
आता Add वर क्लिक करा. Add मध्ये क्विक रिप्लाय करण्यासाठी मेसेज तयार करावा लागेल. त्यानंतर Save वर क्लिक करा.