WhatsApp वर तुम्ही एकाहून अधिक बँक अकाउंट वापरत असाल आणि त्यापैकी एक हटवायचं असेल, तर WhatsApp च्या लेटेस्ट वर्जनवर हे करता येऊ शकतं. हे फीचर Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.
सध्या पेमेंटसाठी Google Pay, UPI, Paytm सह अनेक पेमेंट गेटअवे आहेत. परंतु आता इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp वरही Payment चा पर्याय देण्यात आला आहे. जर तुम्हीही WhatsApp Payment Service चा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
बँक अकाउंट हटवायचं असल्यास सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Payment पर्यायावर क्लिक करा. आता बँक अकाउंटची एक लिस्ट दिसेल.
WhatsApp Payment मध्ये जे अकाउंट नको आहे, जे हटवायचं आहे त्याची निवड करा. 3 डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर ‘Remove bank account’ वर क्लिक करा.
कन्फर्मेशननंतर ‘Payment method successfully removed’ असा टेक्स्ट पॉप-अप येईल. Accept Payment वर क्लिक करा.