WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp वर केवळ चॅटच नाही, तर ऑडिओ, व्हिडीओ, फाइल्स, फोटो, पेमेंट अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतात. WhatsApp मुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. मित्र-परिवाराशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी WhatsApp वर ऑडिओ-व्हिडीओ कॉल सर्वात सोयीचं ठरतं. WhatsApp चं एक असं हीडन फीचर आहे, ज्यात तुम्ही कोणाशी सर्वाधिक बोलता हे समजू शकतं.
तुमचा पार्टनर किंवा तुम्ही WhatsApp वर कोणाशी सर्वाधिक बोलता हेदेखील पाहता येतं. तुमच्या पार्टनरच्या फोनचा पासवर्ड माहित असल्यास WhatsApp चेक करू शकता.
WhatsApp वर अनेक ग्रुप्स असतात. त्याशिवाय मित्रांचे पर्सनल चॅट्सही असतात. अशात कोणत्या WhatsApp मेंबरशी अधिक बोललं जातं हे ओळखणं कठीण होतं.
परंतु एका ट्रिकद्वारे तुम्ही सर्वाधिक बोललं जाणाऱ्या WhatsApp मेंबरची माहिती घेऊ शकता. यासाठी 5 स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Settings वर क्लिक करा. यात अनेक ऑप्शन्स दिसतील.
यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण लिस्ट समोर येईल. यात जे नाव पहिलं असेल, त्या WhatsApp युजरशी सर्वाधिक चर्चा होत असेल.