JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp युजर्स सावधान, हॅकर्स असं पाहू शकतात तुमचं चॅट; पाहा सुरक्षिततेसाठी काय आहे पर्याय

WhatsApp युजर्स सावधान, हॅकर्स असं पाहू शकतात तुमचं चॅट; पाहा सुरक्षिततेसाठी काय आहे पर्याय

एका सायबर सुरक्षा रिसर्चरने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स क्लाउड बॅकअपच्या (Cloud Backup) माध्यमातून युजर्सच्या पर्सनल चॅट आणि मीडियापर्यंत पोहचण्याचा मार्ग मिळवू शकतात.

जाहिरात

महत्त्वाची बाब म्हणजे, या सेटिंगनंतर, तुमचंही WhatsApp Status देखील कोणी पाहिलं, हे तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुमचं WhatsApp Status ठेवण्यापूर्वी ही सेटिंग बदलणं फायद्याचं ठरेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे (End-to-end encryption) सेफ असल्याचं सांगितलं जातं. व्हॉट्सअ‍ॅप End-to-end encryption माध्यमातून आपलं चॅट सुरक्षित ठेवतो. यामुळे केवळ सेंडर आणि रिसिव्हर ते चॅट पाहू शकतात. परंतु एका सायबर सुरक्षा रिसर्चरने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स क्लाउड बॅकअपच्या (Cloud Backup) माध्यमातून युजर्सच्या पर्सनल चॅट आणि मीडियापर्यंत पोहचण्याचा मार्ग मिळवू शकतात, असं म्हटलं आहे. सुरक्षा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित - सुरक्षा तज्ज्ञांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकअपच्या हँडलिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत, जे विना एंड-टू-एंड एन्क्रिप्शन क्लाउडवर बॅकअप होतात. द मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका तज्ज्ञांनी समोरचा व्यक्ती तुमचं वैयक्तिक चॅट आणि युजरच्या मीडियापर्यंत पोहोचण्यासाठी Google अकाउंट हॅक करू शकतात, असं म्हटलं आहे. एखाद्या सुरक्षा रिसर्चरने अशाप्रकारे क्लाउड बॅकअप सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक संबंधित तज्ज्ञांनी क्लाउड बॅकअप सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, गायब होणाऱ्या मेसेजचा (Once View) पर्याय वापरुन चॅट सुरक्षित ठेवता येऊ शकातत. असे मेसेज काही काळासाठी चॅटमध्ये दिसतात, त्यानंतर ते गायब होतात. तसंच असे मेसेज क्लाउड बॅकअपवर स्टोरदेखील होत नाहीत.

नवं अपडेट; 14 दिवसांच्या आत पाहावे लागणार WhatsApp वर आलेले Photo-Video, नंतर आपोआपच होणार डिलीट

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅपला एक सुरक्षित प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी कंपनी आता चॅटप्रमाणे क्लाउड बॅकअपसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणण्यासाठी काम करत आहे. WABetaInfo ने केलेल्या ट्विटमध्ये, व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटावर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड Local बॅकअपसाठी काम करत असल्याचं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या