JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फोटोत दिसणाऱ्या या आई-वडिलांसाठी अभिमानास्पद क्षण, मुंबईकर मुलाची जगभर चर्चा

फोटोत दिसणाऱ्या या आई-वडिलांसाठी अभिमानास्पद क्षण, मुंबईकर मुलाची जगभर चर्चा

मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे सह संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सोमवारी CEO पदाचा राजीनामा दिला. आता Twitter चे नवे CEO म्हणून भारतीय अमेरिकी पराग अग्रवाल यांनी धुरा हाती घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे सह संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सोमवारी CEO पदाचा राजीनामा दिला. आता Twitter चे नवे CEO म्हणून भारतीय अमेरिकी पराग अग्रवाल यांनी धुरा हाती घेतली आहे. याआधी पराग कंपनीचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून काम पाहत होते. पराग यांनी IIT Bombay मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी Yahoo आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 2011 पासून ट्विटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पराग अग्रवाल सोशल मीडियावर पत्नीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. त्यांनी आपल्या आई-वडिलांचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पराग यांचा जन्म भारतातच झाला असून त्यांचं बालपण, शिक्षणही भारतातच झालं आहे. त्यांनतर करियरसाठी ते अमेरिकेत गेले. त्यांनी बीटेक इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी स्टॅनफॉर्ड यूनिव्हर्सिटीतून पीएचडीही केली आहे. याच यूनिव्हर्सिटीमध्ये विनीता त्यांच्या पत्नीनेही शिक्षण घेतलं आहे.

लाँग टाइम पार्टनरशी केलं लग्न - पराग अग्रवाल यांनी त्यांची लाँग टाइम पार्टनर विनीता अग्रवालशी लग्न केलं. पराग आणि विनीता यांचा ऑक्टोबर 2015 मध्ये साखरपुडा झाला होता, तर जानेवारी 2016 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. हे दोघेही कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहत असून त्यांना एक मुलगाही आहे.

कोण आहे पराग यांची पत्नी - विनीता अग्रवाल या स्टॅनफॉर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये फिजिशियन आणि सहाय्यक क्लिनीकल प्रोफेसर आहेत. त्यांनी स्टॅनफॉर्ड यूनिव्हर्सिटी आणि हारवर्ड यूनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. त्याशिवाय विनीता यांनी मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून पीएचडी केली आहे. त्यांनी मेडिकल आणि टेक्निकल क्षेत्रात आतापर्यंत मोठं काम केलं आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ हारवर्ड अँड एमआयटीतून जेनेटिक बेसिस ऑफ कॉमन डिसीजचं शिक्षण घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या