वीज बिल हा महिन्याच्या खर्चातील सर्वात मोठा भाग आहे. त्यामुळे अनेक जण वीज बिल कमी येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. दररोजच्या घाई-गडबडीच्या वेळी अनेक जण अशा काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, ज्या वीज बिल कमी करण्यास मदत करू शकतात.
छोटे बदल मोठा फायदा - वीज बिल कमी येण्यासाठी घरातील काही डिव्हाइसमध्ये छोटे बदल करता येतील. जर तुम्ही अगदी जुन्या बल्बचा वापर करत असाल, तर ते वापरणं बंद करा. अशा बल्बमुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढतं.
थंडीच्या दिवसात हिटरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अधिक क्षमतेच्या हिटरचा वापर करत असाल, तर याचा वीज बिलावर परिणाम होऊ शकतो.
अनेक घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी जुन्या गिझरचा किंवा रॉडचा वापर केला जातो. या दोन्हीमुळे जास्त बिल येतं. त्यामुळे जुना गिझर असल्यास तो बदलणं फायद्याचं ठरेल.