नवी दिल्ली, 17 डिसेंबर : ‘बादशाह’ (Baadshah) हा हिंदी चित्रपट आठवतो. बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) या चित्रपटामध्ये एक असा गॉगल होता, जो डोळ्यांवर लावून कपड्यांच्या आरपार पाहता येत होतं. अशा गोष्टी चित्रपटातच दाखवल्या जातात, प्रत्यक्षात हे शक्य नाही, असा जर तुम्ही विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण वन प्लस (OnePlus) कंपनीच्या वन प्लस 8 प्रो (OnePlus 8 Pro) या मोबाइलचा कॅमेरा कपड्याच्या आरपार पाहण्यास सक्षम आहे. अर्थात या कॅमेऱ्याचे हे वैशिष्ट्य फोनच्या नवीन अपडेटमध्ये बंद करण्यात आलं आहे. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे. वन प्लस कंपनीने असा मोबाईल बनवला आहे, ज्याचा कॅमेऱ्यामुळे कपड्यांच्या आरपार दिसू शकतं. पण असा मोबाइल का बनवला गेला? हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर, वन प्लस 8 प्रो या मोबाइलच्या विक्रीला चालना देण्यासाठी, त्याच्या कॅमेऱ्यात असे फीचर समाविष्ट केले गेले होते. ज्यामध्ये इन्फ्रारेड लाईटचा वापर करण्यात आला होता. या कॅमेऱ्यामुळे कपड्यांच्या आरपार दिसत होतं! द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेव्हा डिव्हाइसचा कॅमेऱ्यातून कपड्यांच्या आरपार दिसत असल्याचे समोर आले, तेव्हा एकच गोंधळ उडाला. कारण या कॅमेऱ्यामुळे लोकांची प्रायव्हसी धोक्यात आली. वाचा : WhatsApp द्वारे कोणी तुमच्यावर नजर ठेवतंय? या 5 सेटिंग्समध्ये लगेच करा बदल कंपनीने या फोनचा कॅमेरा कपड्यांवर टेस्ट करून पाहिला नव्हता. मात्र,जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा कंपनीने नवीन अपडेटद्वारे हे फीचर फोनमधून काढून टाकले. या मोबाईलमध्ये फोटो क्रोम लेन्ससह (Photochrome Lens) 4 रियर कॅमेरे होते. त्याचा फिल्टर इन्फ्रारेड लाईटचा वापर करून फोटोला युनिक कलर देत होता. मोबाईलच्या कॅमेऱ्याचे हे फीचर अमेरिकेत पहिल्यांदा लक्षात आले. अमेरिकेचा बेन गेस्किन (Ben Geskin) यांनी हा खुलासा केला. त्याने वन प्लस 8 प्रोच्या कॅमेराने व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सच्या आरपार दिसत होतं. वाचा : एका सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई, हे App चुकूनही डाउनलोड करू नका हा फोन बनवणाऱ्या शेनझेन कंपनीने (Shenzhen Company) चीनच्या सोशल मीडिया अॅप Weibo वर एक स्टेटमेंट जारी करून फोनमधील अशा फीचरबद्दल माफीही मागितली होती. पण त्यापूर्वीच अनेक यूजर्सने या फोनमधून असा फोटो काढून सोशल मीडियावर टाकले होते, ज्यामध्ये कपड्यांच्या आरपार दिसत होते. लोकांची प्रायव्हसी धोक्यात आणणारे कॅमेऱ्याचे हे फीचर कंपनीने बंद केलयं. पण अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कंपनीवर माफी मागण्याची वेळ आली.