फेसबुकवर हॅकर्सकडून अनेकांची फेक, बनावट अकाउंट ओपन केली जात आहेत. अशात जर तुमचंही फेक अकाउंट तयार झाल्याचं समजल्यास काही स्टेप्स फॉलो करुन फेक अकाउंटबद्दल तक्रार करू शकता.
तुमचं फेसबुकचं फेक अकाउंट असल्याचं आढळल्यास (Facebook Fake Account) तुमच्या स्वत:च्या अकाउंटवर ते फेक प्रोफाईल शोधा किंवा तुमच्या मित्रांना त्या फेक अकाउंटची लिंक पाठवण्यास सांगा.
त्यानंतर तीन पर्याय दिसतील. Me, a friend, celebrity असे पर्याय दिसतील. तुमचं प्रोफाईल फेक असल्यास Me वर क्लिक करा.