JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / या होळीला कार खरेदीसाठी सुवर्ण संधी; एक दोन नव्हे तब्बल 33 गाड्यांवर बंपर डिस्काउंट

या होळीला कार खरेदीसाठी सुवर्ण संधी; एक दोन नव्हे तब्बल 33 गाड्यांवर बंपर डिस्काउंट

मार्च महिन्यात NEXA, MARUTI SUZUKI, HYUNDAI, TATA, MAHINDRA, TOYOTA, HONDA च्या कार्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहेत. या डिस्काउंट ऑफरअंतर्गत ग्राहक 3.06 लाख रुपयांची बचत करू शकतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मार्च : कार खरेदीचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. मार्च महिन्यात NEXA, MARUTI SUZUKI, HYUNDAI, TATA, MAHINDRA, TOYOTA, HONDA च्या कार्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहेत. या डिस्काउंट ऑफरअंतर्गत ग्राहक 3.06 लाख रुपयांची बचत करू शकतात. Maruti Suzuki कार्सवर काय आहेत ऑफर्स - Maruti Suzuki S-Presso - या गाडीवर 20000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 20000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहेत. तसंच 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळून एकून या कारवर 44000 पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. Maruti Suzuki Celerio - या गाडीवरही कॅश डिस्काउंट 20000, 20000 पर्यंत एक्सचेंज बोनस आणि 4000 पर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे. Maruti Suzuki Swift आणि Maruti Suzuki Eeco - या दोन गाड्यांवर एकूण 44 हजारपर्यंत डिस्काउंट असून यात 20000 रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजारपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. Maruti Suzuki Alto - या गाडीवर एकूण 39 हजारांचा डिस्काउंट जाहीर केला असून 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि 4 हजारांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Maruti Suzuki Wagon R - या गाडीवर एकूण 34 हजारांचा डिस्काउंट असून यात 15 हजार कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Maruti Suzuki Brezza - या गाडीवरही 34 हजारांचा डिस्काउंट आहे. परंतु यात कॅश ऑफर 10000 रुपये असून, 20000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 4 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Maruti Suzuki Dzire Facelift - या कारवर 24 हजार रुपये डिस्काउंट असून यात कॅश डिस्काउंट 20000 रुपये असून 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. या गाडीवर कोणताही एक्सचेंज बोनस देण्यात येत नाहीये. Hyundai कार्सवरील ऑफर - Hyundai Santro - सँट्रोवर 40 हजारांची एकूण ऑफर असून यात 20 हजार कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे. Hyundai NIOS - या कारवर 45 हजारांचा डिस्काउंट आहे. 30 हजार कॅश डिस्काउंट, 10 हजार एक्सचेंज बोनस आणि 5 हजार कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Hyundai Xcent Prime - या कारवर 50000 हजार रुपये कॅश डिस्काउंट आहे. इतर कोणताही डिस्काउंट या गाडीवर नाही. Hyundai Aura - या गाडीवरही 50 हजारांचा डिस्काउंट असून 30 हजार कॅश डिस्काउंट, 15 हजारांपर्यंच एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. TATA कार्सवरही बंपर डिस्काउंट - Tata Harrier - या कारवर तब्बल 70 हजारांचा डिस्काउंट आहे. यात 25 हजारांचा कॅश डिस्काउंट, 40 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Tata Tigor - या गाडीवर 33 हजारांचा डिस्काउंट आहे. यात 15 हजार कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Tata Tiago - या कारवर 28 हजारांचा डिस्काउंट असून 15000 कॅश डिस्काउंट, 10 हजार एक्सचेंज ऑफर आणि 3000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Tata Nexon - टाटाच्या या कारवर 28 हजारांची सूट असून 15 हजार एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Mahindra Car Offers - Mahindra XUV500 - महिंद्राच्या कार्सवरही बंपर डिस्काउंट आहे. या कारवर 80,800 रुपयांचा डिस्काउंट असून यात 36,800 रुपये कॅश डिस्काउंट, 20000 पर्यंत एक्सचेंज बोनस आणि 15000 रुपयांपर्यंत फ्री एक्सेसरीज देण्यात येणार आहे. तर 9000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Mahindra Scorpio - स्कॉर्पियोवर 7000 चा कॅश डिस्काउंट आहे. तर 15 हजारपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. तसंच 4500 कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10000 रुपये फ्री एक्सेसरीज देण्यात येणार आहेत. असा एकूण 36500 रुपयांची सूट आहे. Mahindra XUV300 - या कारवर 10000 रुपये कॅश डिस्काउंट, 25 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस, 4500 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट तर 5000 पर्यंत फ्री एक्सेसरीज देण्यात येणार आहेत. Mahindra KUV100 NXT - या गाडीवर 38000 कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Mahindra Alturas G4 - या गाडीवर तब्बल 3.06 रुपयांपर्यंत ऑफर आहे. यात 2.20 लाखांचा कॅश डिस्काउंट, 50000 पर्यंत एक्सचेंज बोनस, 16 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 20 हजारांपर्यंत फ्री एक्सेसरीज अशी बंपर सूट आहे. NEXA car discount - Maruti Suzuki NEXA S-Cross - या कारवर 37 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजारपर्यंत एक्सचेंज ऑफर, 10 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट असा एकूण 67 हजार रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट मिळणार आहे. Maruti Suzuki NEXA Ciaz - या कारवर 10 हजारांचा कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस, 10 हजार कॉर्पोरेट डिस्काउंट अशी एकूण 40 हजारांची सूट या कारवर आहे. Maruti Suzuki NEXA Baleno - बलेनोवर 10 हजार रुपये कॅश ऑफर, 10 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10 हजारांचा होळी बुकिंग रिटेल स्किम असा डिस्काउंट आहे. त्यामुळे ही गाडी 34 हजारांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येऊ शकते. Maruti Suzuki NEXA Ignis - या गाडीवरही 10 हजारांचा होळी बुकिंग रिटेल स्किम असा डिस्काउंट आहे. तसंच 10 हजार कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्सचेंज ऑफर आणि 4 हजार कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Maruti Suzuki NEXA XLS - या कारवर 14 हजारांची सूट असून 10 हजार एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Toyota ऑफर - Toyota Yaris - टोयोटाच्या या कारवर एकूण 65 हजारांचा डिस्काउंट असून यात 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 25 हजार एक्सचेंज बोनस, 20 हजार कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. Toyota Glanza - 10 हजार कॅश ऑफर, 10 हजार एक्सचेंज ऑफर, 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट असा एकूण 24000 रुपयांचा डिस्काउंट आहे. Toyota Urban Cruiser - या कारवर एक्सचेंज ऑफर 20000 रुपये मिळणार आहे. Honda Cars Offers - Honda Amaze - या गाडीवर 10 हजारांचा कॅश डिस्काउंट आहे. तर 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आहे. तसंच 4 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळून एकूण 25000 रुपयांपर्यंतची सूट आहे. Honda WRV - या कारवर 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळून एकूण 30 हजारांचा डिस्काउंट आहे. Honda Jazz - या कारवरही 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळून एकूण 30 हजारांची सूट आहे. Honda CR-V - या कारवर 10 हजारांचा एक्सचेंज बोनस असा डिस्काउंट आहे. Maruti Suzuki, Hyundai, Tata, Mahindra, NEXA, Toyota आणि Honda कडून देण्यात येणाऱ्या ऑफर्स मर्यादित काळासाठी असून या ऑफर्स वेगवेगळ्या राज्यात आणि डिलरशिप्सनुसार बदलू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या