JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Tesla ला टक्कर देणार या भारतीय कंपन्या, 5 इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार

Tesla ला टक्कर देणार या भारतीय कंपन्या, 5 इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार

आगामी काळात Electric Car ची मागणी पाहता, टेस्ला कारने भारतात एन्ट्री केली. सध्या Tesla ने जगातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Audi, Mercedes, BMW, Toyota आणि volkswagen सह मार्केट कॅपवर एकट्याने कब्जा केला आहे. त्यामुळे भारतात टेस्लाच्या एन्ट्रीनंतर, आता भारतीय कार निर्माता कंपन्याही टक्कर देण्यासाठी बाजारात उतरत आहेत.

0105

Maruti, Mahindra आणि Tata सारख्या कंपन्या सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहेत. महिंद्रा येणाऱ्या दिवसांत पॉप्युलर XUV300 चं इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच करणार आहे. या कारला 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 13 लाख रुपये असू शकते.

जाहिरात
0205

मारुती सर्वात पॉप्युलर हॅचबॅक कार WagonR चं इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच करण्याची तयारी करत आहे. या कारची सुरुवातीची किंमत जवळपास 8 लाखांपर्यंत असू शकते.

जाहिरात
0305

टाटा मोटर्सने 89th Geneva International Motor शोमध्ये आपल्या H2X मायक्रो एसयूवीचं इलेक्ट्रिक वेरिएंट प्रदर्शित केलं होतं. टाटा ही कार भारतात लवकरच लाँच करण्याची योजना आखत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

जाहिरात
0405

टाटा आणखी एका सर्वात पॉप्युलर हॅचबॅक कार Altroz चं इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच करू शकते. या कारची किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये lithium-ion battery चा वापर करण्यात आला आहे, जो या कारला सिंगल चार्जमध्ये 250 ते 300 किमीपर्यंतची रेंज देईल.

जाहिरात
0505

महिंद्राने 2020 फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आणखी एक इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली होती. महिंद्रा eKUV100 या कारला भारतात लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 8 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल. ही कार सिंगल चार्जमध्ये 130 ते 150 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या