JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / NASA: आता चंद्रावरही 4G नेटवर्क; मिळणार हायस्पीड इंटरनेट

NASA: आता चंद्रावरही 4G नेटवर्क; मिळणार हायस्पीड इंटरनेट

अमेरिकी स्पेस एजेंसी NASA आणि Nokia मिळून चंद्रावर 4G LTE कनेक्टिव्हिटी पोहचवणार आहेत. त्यानंतर त्याला 5G मध्ये अपग्रेड केलं जाईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : आता चंद्रावर हाय स्पीड इंटरनेट सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. अमेरिकी स्पेस एजेंसी NASA आणि Nokia मिळून चंद्रावर 4G LTE कनेक्टिव्हिटी पोहचवणार आहेत. त्यानंतर त्याला 5G मध्ये अपग्रेड केलं जाईल. नासाकडून या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यासाठी नोकियाला USD 14.1 मिलियन फंड दिला जाणार आहे. NASA Artemin Program अंतर्गत 2024 पर्यंत चंद्रावर मॅन्ड मिशन पाठवण्याची तयारी आहे. NASA Artemin दरम्यान नोकिया, कम्युनिकेशनमध्ये मोठी भूमिका बजावणार आहे. या प्रोजेक्टसाठी 14 कंपन्यांचं सिलेक्शन - स्पेस एजेंसी NASA ने एकूण 14 अमेरिकी कंपन्यांची निवड केली आहे, ज्या चंद्रावर 4G नेटवर्कसाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतील. या मिशनसाठी एकूण USD 370 मिलियन फंडचं वाटप करण्यात आलं आहे. 2022 पर्यंत चंद्रावर पोहचेल 4G नेटवर्क - नोकियाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात पहिलं वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टम 2022 च्या अखेरीस चंद्राच्या पृष्ठभागावर तयार केलं जाईल. नेटवर्क अंतराळवीरांना आवाज आणि व्हिडीओ कम्युनिकेशन करण्याची सुविधा देणार असल्याचंही कंपनीने सांगितलं. Bell Labs ने ट्विट करत दिली माहिती - नोकियाची रिसर्च आर्म, Bell Labs ने ट्विट करत, याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तंत्रज्ञानात प्रगती करण्यासाठी एक प्रमुख भागीदार म्हणून नासाने निवड केल्याबद्दल उत्साहित असून यामुळे चंद्रावर मनुष्याच्या अस्तित्वाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत मिळेल.

संबंधित बातम्या

लाँचिग आणि लँडिगची संपूर्ण माहिती - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नेटवर्क अशाप्रकारे लाँच केलं जाईल की, लाँचिंग आणि लँडिगची संपूर्ण माहिती दिली जाऊ शकेल. याचा आकार, वजन आणि वीजेची कमतरता पूर्ण करण्यासाठी, कॉम्पॅक्ट करून चंद्रावर पाठवलं जाईल. हाय-टेक्नोलॉजी - या कंपन्यांकडून चंद्रावर सर्फेस पॉवर जनरेशन आणि रोबॉटिक्सही लावण्यात येणार आहे. या हाय टेक्नोलॉजीच्या आधारे चंद्रावर 4G नेटवर्क लावलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या