JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जुनी कार विकून चांगली किंमत मिळवायची आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स

जुनी कार विकून चांगली किंमत मिळवायची आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स

आपल्याकडे लेटेस्ट कार असावी या उद्देशानं अनेक लोक आपली जुनी कार (Sell Old Car) विकून नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, जुन्या कारची योग्य किंमतीला विक्री (Selling Price of Old Car) करता येत नसल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 मार्च: कोविड-19 (COVID-19) महामारीनंतर वाहन बाजारात तेजी आली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा (Public Transport) वापर करणं शक्यतो टाळत आहेत. परिणामी सध्या कार विक्रीमध्ये (Car Selling) वाढ होताना दिसत आहे. वाढती मागणी पाहून वाहननिर्मिती कंपन्यांनीदेखील (Automotive Companies) अॅडव्हान्स्ड आणि नवीन मॉडेल्सच्या गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. लोकांना चांगले फीचर्स, उत्तम दर्जा आणि मायलेज असलेली चांगली कार उपलब्ध करून देण्याचा उद्देश या कंपन्यांचा असतो. आपल्याकडे लेटेस्ट कार असावी या उद्देशानं अनेक लोक आपली जुनी कार (Sell Old Car) विकून नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, जुन्या कारची योग्य किंमतीला विक्री (Selling Price of Old Car) करता येत नसल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. जर अशा लोकांना त्यांच्या जुन्या कारसाठी योग्य किंमत मिळाली तर त्यांचं नवीन कार घेण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. जुनी कार विकताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या जुन्या कारलाही चांगली किंमत मिळू शकते. हे वाचा- कार घेण्याचा विचार करताय? बाइकपेक्षाही स्वस्तात मिळतेय Maruti ची ही Car गाडीची स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची कार वापरायची असो किंवा विकायची तिची स्वच्छता खूप महत्त्वाची ठरते. कोणताही ग्राहक सेकंडहँड (Second Hand) गाडी खरेदी करताना तिची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता नक्कीच पाहतो. कारचा फर्स्ट लुक कोणत्याही व्यक्तीला तिच्याकडं आकर्षित करण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे गाडीतील सीट, मॅट, दरवाजे, बोनेट, डिक्की आणि खालील भागात धूळ आणि घाण साचण्याची शक्यता अधिक असते. म्हणून या भागांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कार स्वच्छ असल्यास ग्राहकाकडून तिला चांगली किंमत मिळू शकते. स्वच्छतेसोबतच कारच्या इंटिरियरलादेखील (Car Interior) खूप महत्त्व असते. कोणत्याही ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी चांगलं इंटिरियर पुरेसं ठरतं. त्यामुळे आतील भागात काही समस्या असल्यास ती तात्काळ दूर करा. कारच्या बॉडीवर असलेले डेंट्स (Dents) आणि ओरखडे (Scratches) नीट करून घ्या. खराब झालेले टायर बदला, गरज पडल्यास कार पेंट करून घ्या. जर ग्राहकाला तुमची कार व्यवस्थित दिसली तर तो आनंदानं चांगली किंमत देईल. हे वाचा- क्रॅश टेस्टमध्ये भारतातील या Cars ला 5 स्टार रेटिंग, ठरल्या सर्वात सुरक्षित कार वेळेत करा गाडीचं सर्व्हिसिंग जुनी कार खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही ग्राहकाला कारची सर्व्हिसिंग (Car Servicing) वेळेवर होत आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असतं. त्यामुळं वेळच्यावेळी गाडीची सर्व्हिसिंग करत चला. शिवाय, कार विक्रीला काढण्यापूर्वी तीची सर्व्हिसिंग नक्की करून घ्या. सर्व्हिसिंग केल्यानंतर त्याची बिलं (Servicing Bills) आणि इतर कागदपत्रं तुमच्याकडे ठेवा. जेव्हा एखादा ग्राहक कार घेण्यासाठी येतो तेव्हा त्याला सर्व्हिसिंगची कागदपत्रे नक्की दाखवा. असं केल्यास ग्राहकांचा कार व विक्रेत्यावरील विश्वास वाढेल आणि कारला चांगली किंमत मिळेल. गाडीची कागदपत्र योग्य असणं गरजेचं कोणतंही वाहन खरेदी-विक्री करताना कागदपत्रं (Documents) असणं अत्यंत आवश्यक आहे. जर कागदपत्रे नसतील चलानच्या स्वरूपात मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळं आरसी, इन्शुरन्स, प्रदूषण सर्टिफिकेट, पेडिंग चलान या गोष्टी व्यवस्थित ठेवा. तुमच्याकडं ही कागदपत्रं नसतील तर तुमच्या कारला ग्राहक मिळणार नाही. कारण, जर एखाद्या ग्राहकानं कागदपत्रांविना तुमची कार खरेदी केली तर त्याला नंतर जास्त खर्च करण्याची वेळ येऊ शकते. जर गाडीची कागपत्र उपलब्ध नसतील तर ग्राहक तुमची कार खरेदी करणार नाही किंवा मग खूप कमी किंमत देईल. त्यामुळं कारशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवा. हे वाचा- Car मधल्या ‘या’ अ‍ॅक्सेसरीजमुळे वाढतो अपघाताचा धोका, चुकूनही वापरू नका ग्राहकाला द्या टेस्ट ड्राइव्हची संधी कुठलीही गाडी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाला टेस्ट ड्राईव्ह (Test Drive) घेण्याची इच्छा असते. मग, ती कार नवीन असो किंवा सेकंडहँड. त्यामुळं आपली जुनी कार विकताना तुम्ही स्वत:च ग्राहकाला टेस्ट ड्राईव्हची संधी द्या. यामुळं विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाची भावना वाढेल. शिवाय, ग्राहकाला कारच्या मूळ स्थितीबद्दल माहितीही मिळेल. टेस्ट ड्राईव्हनंतर ग्राहकाला कार आवडली तर तो निश्चितपणे चांगल्या किंमत मोजू शकतो. वरील गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या जुन्या कारलाही निश्चितपे चांगली किंमत मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या