JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / अजब! अवघ्या 20 पैशांत गाठता येणार 1 किमी, या मोटर कंपनीने केला दावा

अजब! अवघ्या 20 पैशांत गाठता येणार 1 किमी, या मोटर कंपनीने केला दावा

आपल्या देशामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-diesel Price) प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या किमतींमुळे कार (Car) किंवा दुचाकी (Two-wheeler) चालवणं कठीण होत चाललं आहे. वाढत्या इंधनदरांमुळे मध्यमवर्गीय लोक तर आता स्कूटर (Scooters) किंवा बाईकचा (Bike) वापर शक्यतो टाळत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 30 मार्च-  आपल्या देशामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-diesel Price) प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या किमतींमुळे कार (Car) किंवा दुचाकी (Two-wheeler) चालवणं कठीण होत चाललं आहे. वाढत्या इंधनदरांमुळे मध्यमवर्गीय लोक तर आता स्कूटर (Scooters) किंवा बाईकचा (Bike) वापर शक्यतो टाळत आहेत. बाईकच्या तुलनेत स्कूटरचं अ‍ॅव्हरेज (Scooter Average) खूपच कमी असतं. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक स्कूटर्सचं अ‍ॅव्हरेज 45 किमी प्रतिलिटर आहे. दिल्लीसारख्या रहदारीच्या शहरात तर हे अ‍ॅव्हरेज आणखी कमी होतं. अशा स्थितीत जर तुम्हाला केवळ 20 पैशांमध्ये एक किलोमीटरचा प्रवास करायला मिळाला तर? या गोष्टीवर सहजासहजी कुणाचा विश्वास बसणार नाही पण, हे एकदम खरं आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या होप इलेक्ट्रिक कंपनीनं (HOP Electric Mobility) असा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सध्याच्या ई-स्कूटरचा (E Scooter) वापर करून तुम्ही केवळ 20 पैसे खर्च करून एक किलोमीटरचा प्रवास करू शकता. पेट्रोल स्कूटरपेक्षा हा खर्च फारच कमी आहे. किंमत आणि फीचर्स- होप लियो (HOP LEO) इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 72 हजार 500 रुपये आणि होप लाईफ (HOP LYF) इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 65 हजार 500 रुपये आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, या इलेक्ट्रिक स्कूटर एका वेळेस पूर्ण चार्जिंग केल्यास 125 किलोमीटरपर्यंत धावतात. या स्कूटरमध्ये 72V आर्किटेक्चर, उच्च कार्यक्षमता असलेली मोटर आणि 19.5 लीटरची बूट स्पेस आहे. इंटरनेट (Internet), जीपीएस (GPS) आणि मोबाईल अ‍ॅपसारखी कनेक्टेड फीचर्ससुद्धा देण्यात आली आहेत. होप इलेक्ट्रिक मोबिलिटीनं जयपूरमध्ये (Jaipur) होप मेगाप्लेक्स (Hop Megaplex) सुरू केलं आहे. होपनं आपली एकूण वार्षिक उत्पादन क्षमता 1.80 लाख युनिट्सपर्यंत वाढवली आहे. होप आपल्या जयपूरमधील मेगाप्लेक्समध्ये सध्या होप लियो आणि होप लाईफ या इलेक्ट्रिक स्कूटरचं उत्पादन करत आहे. लवकरच येणार ई-बाईक- होप इलेक्ट्रिक मोबिलिटी येत्या काळात आपली आणखी दोन नवीन उत्पादनं लाँच करणार आहे. यामध्ये हायस्पीड इलेक्ट्रिक बाईक HOP OXO आणि एका इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. या दोन्ही मॉडेल्सना एकदा चार्ज केल्यानंतर अनुक्रमे 150 किमी आणि 120 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळेल, असं म्हटलं जातं आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये (electric vehicle segment) अनेक घडामोडी होत आहेत. भविष्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचं ध्येय भारतानं ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवर होपच्या कमी प्रवास खर्चाच्या स्कूटर्सला चांगलं मार्केट मिळू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या