मुंबई, 10 मे : तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग चांगली संधी देत आहे. सॅमसंगच्या ऑफिशिअल वेबसाईटवर Mother’s Day with galaxy ऑफर सुरू आहे. 11 मे पर्यंत ही ऑफर असणार आहे. यामध्ये ग्राहकांना सॅमसंगचे प्रीमियम स्मार्टफोन अर्ध्याहून कमी किंमतीत मिळू शकतात. यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी S9 (Samsung Galaxy S9) चा समावेश आहे. हा फोन लाँच झाला तेव्हा किंमतीमुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता कमी रेंजमध्ये हा फोन उपलब्ध करून दिला जात आहे. सॅमसंगचा हा फोन मदर्स डे ऑफर सेलमध्ये 62 हजार 999 रुपयांचा हा फोन फक्त 22 हजार 999 रुपयांत दिला जात आहे. यावर ग्राहकांना जवळपास 39 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
हे वाचा : WhatsApp वर मिळणार सर्वात मोठं फीचर, ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी ठरणार महत्वाचं
सॅमसंग गॅलेक्सी S9 मध्ये 5.8 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 8.1 ओरिओसह लाँच करण्यात आला होता. 1.7GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेल्या फोनची स्टोरेज क्षमता 400 जीबीपर्यंत वाढवता येते. सुपर स्पीड डुअल पिक्सलसह 12 मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा यामध्ये आहे.सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय 3000mAh बॅटरी आहे.
हे वाचा : फेसबुकने बदललं डिझाइन, Whatsapp नंतर पहिल्यांदाच दिलं ‘हे’ फीचर