बंपर डिस्काउंट! Celerio ते WagonR, मारुतीच्या ‘या’ वाहनांवर मिळतीये मोठी सूट, लाभ घेण्याची संधी सोडू नका
मुंबई, 17 जुलै : भारतीयांचा कार खरेदीकडचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात मारूती सुझुकीच्या कारना प्रचंड मागणी आहे. आता मारूती लव्हर्ससाठी एक खुशखबर आहे. मारूती सुझूुकीची कार खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळणार आहे. मारूती सुझुकीची कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. मारूती सुझुकीच्या एरिना आणि नेक्सा डिलरशिपद्वारे मारुती आपल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट (Discount on Maruti Suzuki Cars) देत आहे. या सवलती रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात दिल्या जात आहेत. मारुती सुझुकी सेलेरिओवर 35,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. मारूती सुझुकीची टॉप सेलिंग कार वॅगन आरच्या (WagonR) 1.0 लिटर प्रकारावर कंपनी 25,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपये कॉर्पोरेट सूट देत आहे. याशिवाय वॅगन आर आणि स्विफ्टच्या (Swift) 1.2 लिटर प्रकारांवर 15,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि प्रत्येकी 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. हेही वाचा: Cheapest Car Loan: नवीन कार घ्यायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायेत 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज यासोबतच मारुती सुझुकीची स्वस्तात मस्त कार एस प्रेसो ग्राहकांना आणखी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. एस-प्रेसोवर 15,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. Alto 800 आणि Eeco वर 10,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळू शकते. डिझायरवर 5,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. तथापि, नवीन Brezza किंवा Ertiga वर कोणतीही सूट नाही. मारुती आपल्या नेक्सा रेंजद्वारे एस-क्रॉसवर 22,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. इग्निसवर 23,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. याशिवाय 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट Ciaz वर दिला जात आहे. तथापि, XL6 किंवा नवीन Baleno साठी कोणतीही ऑफर नाही.