JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Cars : OLA ची इलेक्ट्रिक कार Tesla पेक्षाही भारी, रेंज 400 KM पेक्षा जास्त तर किंमतही बजेटमध्ये

Cars : OLA ची इलेक्ट्रिक कार Tesla पेक्षाही भारी, रेंज 400 KM पेक्षा जास्त तर किंमतही बजेटमध्ये

इलेक्ट्रिक स्कूटरने ऑटोमोबाईल बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या OLA ची इलेक्ट्रिक कारही लवकरच बाजारात दाखल होणार आहे. अलीकडेच ओला इलेक्ट्रिक कारचे काही फोटो आणि माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे.

जाहिरात

OLA ची इलेक्ट्रिक कार Tesla पेक्षाही भारी, रेंज 400 KM पेक्षा जास्त तर किंमतही बजेटमध्ये

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इलेक्ट्रिक स्कूटरने ऑटोमोबाईल बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या OLA ची इलेक्ट्रिक कारही लवकरच बाजारात दाखल होणार आहे. अलीकडेच ओला इलेक्ट्रिक कारचे काही फोटो आणि माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे. हे पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की ओला इलेक्ट्रिक कार केवळ लूकमध्येच नाही तर फीचर्समध्येही टेस्ला सारख्या कारला टक्कर देईल. OLA च्या इलेक्ट्रिक कारचे लीक झालेले फोटो पाहता, असा अंदाज लावला जाऊ शकतो की कार अद्याप कॉन्सेप्ट स्टेजवर आहे.आणि कार अद्याप उत्पादनासाठी तयार नाही. OLA ने काही दिवसांपूर्वी त्यांच्या इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती दिली होती, तेव्हा एक टीझरही लाँच करण्यात आला होता. या टीझरमध्ये लाल रंगाच्या कारचा फ्रंट लूक दाखवण्यात आला होता. यामध्ये OLA चे नाव कारच्या हेडलाईट समोर दिसून येत होते. OLA इलेक्ट्रिक कार ही सेडान कार असेल, जी काहीशी टेस्ला मॉडेल 3 सारखी दिसते. कारला मागील बाजूस वेगळे डिझाइन देण्यात आले आहे. त्याचवेळी, कारचे डिझाइन पूर्णपणे एरोडायनॅमिक केले गेले आहे. कारचा व्हीलबेसही जास्त चांगला दिसतो. लांब व्हीलबेसचा थेट फायदा मोठा बॅटरी पॅक बसवण्याच्या दृष्टीने होईल. लांब व्हीलबेसमुळे कारमध्ये भरपूर जागा असेल.

त्याच वेळी, बाकीच्या इलेक्ट्रिक कार्सप्रमाणे फ्रंट ग्रिल देखील दिलेले नाही. कारच्या हेडलाईट्सला एलईडी लाईटची लाइन जोडते. ही कार ड्युअल टोनमध्ये लॉन्च केली जात आहे. त्याचवेळी, कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देखील दिले जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या