JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp Update! आता युजर्स दोन दिवसांनंतरही डिलिट करू शकतील पाठवलेला मेसेज

WhatsApp Update! आता युजर्स दोन दिवसांनंतरही डिलिट करू शकतील पाठवलेला मेसेज

WhatsApp असं अपडेट आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला, ग्रुपमध्ये (WhatsApp Group) पाठवलेला मेसेज दोन दिवसांमध्ये कधीही डिलीट (Delete For Everyone Feature) करू शकता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. कंपनी देखील आपल्या यूजर्ससाठी सतत नवे अपडेट देत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅप असं अपडेट आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला, ग्रुपमध्ये (WhatsApp Group) पाठवलेला मेसेज दोन दिवसांमध्ये कधीही डिलीट (Delete For Everyone Feature) करू शकता. WhatsApp युजर्सला आकर्षित करण्यासाठी नव्या अपडेटवर (New Update) काम करत आहे. हे अपडेट आल्यानंतर तुम्ही दोन दिवसांनंतरही एखादा मेसेज डिलीट करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘Delete For Everyone’ फीचरची वेळ मर्यादा सध्या 1 तास 8 मिनिटं 16 सेकंदांवरून, 2 दिवस आणि 12 तासांपर्यंत वाढवण्याचं काम कंपनीने सुरू केलं आहे. याचा फायदा असा होईल की, जर तुम्ही एखाद्याला चुकीचा मेसेज पाठवला असेल तर तुम्ही दोन दिवसांनी सुद्धा तो डिलीट करू शकाल.

हे वाचा -  WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud,तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवा

याचाच अर्थ युजर्सला मेसेज कायमचा डिलीट करण्यासाठी अडीच दिवस मिळतील. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज डिलीट करण्याच्या सुविधेची मुदत सात दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार केला होता. पण WABetaInfo च्या रिपोर्टनुसार सात दिवसांपेक्षा जास्त काळ अशी सुविधा देणं, ही चांगली कल्पना नाही. कारण लोकांचा त्यांनी आठवड्यापूर्वी पाठवलेला मेसेज हा डिलीट करायचा कोणताही विचार नसतो.

हे वाचा -  वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत

WABetaInfo रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, ‘व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘Delete For Everyone’ फीचरच्या वेळ मर्यादाबाबतच अपडेट व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.22.410 वर दिसला आहे, आणि नंतर अ‍ॅपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये येऊ शकतो. हे अपडेट अद्याप उपलब्ध नसेल. बीटा टेस्टर्ससाठी देखील ते उपलब्ध नाही. मेसेज डिलीट करण्याची वेळेची मर्यादा बदलण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ नाही, व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वीही मेसेज डिलीट करण्याच्या मुदतीत बदल केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या