वेब सीरिजच्या ट्रेंडसह आता कोरोनामुळे अनेक चित्रपटही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. अशात जर तुम्ही दर महिन्याला Netflix, Amazon Prime आणि Disney Hotstar सारखे OTT प्लॅटफॉर्म्स रिचार्ज करण्यासाठी पैसे खर्च करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.
कोणाच्याही मदतीशिवाय आणि 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर वेब सीरिज, मूव्हीजचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्ही Jio च्या पोस्टपेड प्लॅनचा वापर करत असाल, तर तुम्ही Netflix, Amazon Prime आणि Disney Hotstar सारखे OTT प्लॅटफॉर्म्स फ्रीमध्ये पाहू शकता.
या प्लॅनची वॅलिडिटी एक महिना असून हे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म एक महिन्यापर्यंत या प्लॅनसह फ्रीमध्ये पाहू शकता.
Jio च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 75GB डेटा, दररोज 100 SMS फ्री मिळतात. त्याशिवाय Netfilx, Amazon Prime आणि Disney Hotstar चे सर्व बेनिफिट्सही मिळतात.
जर तुम्ही संपूर्ण वर्षभर या प्लॅनचा वापर करत असाल, तर वर्षभर या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करू शकाल.
Jio च्या केवळ 399 रुपये नाही, तर 599, 799, 999 आणि 1499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्येही या सर्व ऑफर सामिल आहेत.