JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लॉकडाउनचा असाही उपयोग! पठ्ठ्यानं घरीच तयार केलं विमान; चार देशही आला फिरून

लॉकडाउनचा असाही उपयोग! पठ्ठ्यानं घरीच तयार केलं विमान; चार देशही आला फिरून

Kerala Man built own Plane: केरळमधील एका व्यक्तीनं लॉकडाउनमध्ये चक्क फोर-सीटर विमान बनवलं आहे. विशेष म्हणजे त्यानं या विमानातून काही देशही फिरले आहेत.

जाहिरात

लॉकडाउनचा असाही उपयोग! पठ्ठ्यानं घरीच तयार केलं विमान; चार देशही आला फिरून

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे जगभरातील लोक सुमारे दोन वर्षं घरातच बसून होते. यादरम्यान कित्येकांनी आपले जुने छंद पुन्हा जोपासले. कित्येकांनी व्यायाम सुरू केला. तर कित्येक लोक केवळ सोशल मीडियावर आलेली विविध चॅलेंजेस पूर्ण करत होते. या सगळ्यात केरळमधील एक व्यक्ती मात्र स्वतःचं खरंखुरं विमान (Kerala Man built own Plane) तयार करत होती. विशेष म्हणजे हे केवळ विमानाचं मॉडेल नाही, तर खरंखुरं फोर-सीटर विमान आहे. या विमानातून त्याने काही देशही फिरले आहेत. न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मूळ केरळमधील अलापुळा जिल्ह्यातील अशोक हा ब्रिटनमध्ये (UK-Based Kerala man built plane) राहतो. रासप नेते आणि माजी आमदार ए. व्ही. थामराशन यांचा तो मुलगा आहे. पलक्कडमधील एनएसएस इंजिनीअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकलची डिग्री घेऊन 2006 साली अशोक ब्रिटनला शिफ्ट झाला. या ठिकाणी तो फोर्ड कंपनीत काम करत होता. यानंतर त्याला स्वतःचं विमान (Man built own plane in lockdown) घेण्याची इच्छा होऊ लागली. यासाठी त्याने विमान उडवण्याचं लायसन्सही मिळवलं. मात्र, प्रायव्हेट प्लेनची किंमत पाच ते सहा कोटी असल्यामुळे, त्याने थेट घरीच विमान तयार करण्याचं ठरवलं. हेही वाचा-  Smartphone Battery: स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप झालाय कमी? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य अवघ्या 1.8 कोटींमध्ये तयार केलं विमान सध्या सुट्टीवर आपल्या मूळ गावी परतलेल्या अशोकने (Ashok form Kerala built own plane) आपल्या या विमानाबद्दल माहिती सांगितली. “ब्रिटन किंवा बाजूच्या कित्येक देशांमध्ये लोक स्वतःचं लहान विमान तयार करतात. याचे पार्ट सहज उपलब्ध होतात. मी माझ्या विमानाचे काही पार्ट्स दक्षिण आफ्रिकेतून खरेदी केले, इंजिन ऑस्ट्रियामधून खरेदी केलं आणि एव्हिओनिक्स इक्विपमेंट्स अमेरिकेतून खरेदी केली. माझ्या एसेक्समधील घराशेजारीच मी वर्कशॉप उभारलं, आणि 2020 च्या एप्रिल महिन्यात काम सुरू केलं. सुमारे 1,500 तासांची मेहनत आणि 1.8 कोटी रुपये खर्च करून मी हे विमान बनवलं.” असं अशोकने सांगितलं. विमानाला दिलं मुलीचं नाव- अशोक म्हणाला, “सुरुवातीला मी एक टू-सीटर प्लेन तयार करण्याचा विचार केला होता. मात्र, फॅमिली ट्रिपला जायचं झाल्यास कमीत कमी चार सीट्स हवीत त्यामुळे मग मी फोर-सीटर विमान (Man built four-seater plane at home) बनवलं.” अशोक, त्याची पत्नी अभिलाषा दुबे, मोठी मुलगी धारा आणि छोटी मुलगी दिया असं चौघांचे हे कुटुंब आहे. अशोकच्या पत्नी मूळच्या इंदूरच्या आहेत. त्या ब्रिटनमध्ये डेटा अ‍ॅनॅलिस्ट म्हणून काम करतात. अशोकने या विमानाला आपल्या लहान मुलीचं नाव दिलं आहे. ‘G-Diya’ असं या विमानाचं नाव आहे. यामधील जी हा कंट्री कोड आहे. अशोकने बनवलेलं हे विमान 520 किलोचं आहे, आणि 950 किलो एवढा भार ते पेलू शकतं. या विमानाने एका तासात 250 किलोमीटर जाता येते. ब्रिटन हवाई उड्डाण विभागाची मान्यता- “कोरोनामुळे असलेल्या लॉकडाउनमुळे कंपनीने कित्येक प्रोजेक्ट बंद केले होते. त्यामुळे मला यावर जास्त लक्ष देता आलं. ब्रिटनच्या हवाई उड्डाण प्रशासनाने (UK Aviation authority) वेळोवेळी माझं काम तपासून मान्यता दिली. प्रत्येक टप्प्याला ते येऊन चाचणी करत. विमान तयार झाल्यानंतर तीन महिने सातत्याने त्यांनी उड्डाण चाचण्या केल्या. यानंतर 2021च्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी माझ्या विमानाच्या उड्डाणास मान्यता दिली. ब्रिटनमध्ये विमान बनवण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया (Legal tactics to build plane in UK) अगदी सोपी आहे. एखादी गाडी बनवण्याप्रमाणेच हे आहे.” असं अशोकने स्पष्ट केलं. आतापर्यंत फिरला चार देश- उड्डाणास परवानगी मिळाल्यापासून अशोक आणि त्याच्या मित्रांनी मिळून चार देशांची यात्रा केली आहे. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि झेक रिपब्लिक असे चार देश ते फिरले आहेत. या विमानाने आतापर्यंत 86 तास उड्डाण केलंय. आता सुट्टीवरून पुन्हा ब्रिटनला परत गेल्यानंतर आणखी फिरण्याचा आपला विचार असल्याचं अशोकने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या