Reliance Jio 125 Rupees plan: टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढल्यानंतर कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. जिओने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.
मुंबई, 26 मार्च : जगात कोरोना व्हायरस जितक्या वेगानं पसरत चाललाय त्यापेक्षा जास्त वेगानं अफवा पसरत आहेत. कोरोनापेक्षा त्या अफवा खूप धोकादायक आहेत. काही ठिकाणी अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जात आहे तर काही ठिकाणी याचा फायदा घेतला जात आहे. आता असा एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये जिओ कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी 498 रुपयांचा फ्री रिचार्ज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच एक लिंकही देण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादीत काळासाठी असल्याचंही सांगण्यात येत आहे. व्हायरल मेसेजमध्ये लिंक पाठवली जाते. त्यावर प्रोसेस पूर्ण केल्यानंतर रिचार्ज मिळतो असं सांगण्यात आलं आहे. जेव्हा त्या लिंकवर क्लिक केली तेव्हा एक वेबपेज दिसतं. त्यात मुकेश अंबानींचा फोटो आणि एक फॉर्म आहे. त्यामध्ये तुमचे नाव, मोबाइलनंबर यांसारख्या डिटेल्स विचारतं. ही माहिती सबमिट केल्यानंतर पुढचं पेज ओपन होतं. त्यात तुम्हाला ही फ्री ऑफर मिळवायची असेल तर याचं प्रमोशन करावं लागेल असं म्हटलं जातं. त्यात व्हॉटसअॅप ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करायला सांगितला जातो. यामध्ये रिचार्ज करण्यासाठी एक बटन दिलं जातं. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही रोबोट नसल्याचं सिद्ध करण्यासाठी एक टास्क असतो. त्यानंतर आणखी एक लिंक ओपन होते आणि सर्व्हेमध्ये भाग घेण्यास सांगितलं जातं. यातून तुम्हाला रिचार्ज मिळत नाही. ही एक फेक लिंक असून फक्त माहिती चोरण्याच्या आणि फसवण्याच्या उद्देशाने व्हायरल करण्यात आली आहे.
हे वाचा : LockDown मुळे घरी बसलेल्या लोकांसाठी… VIDEO Streaming साठी आता कमी डेटा लागणार
जिओच्या अधिकृत साइटवरून अशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. सध्या जिओने कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर त्यांच्या डेटा अॅड ऑन रिचार्जवर डबल डेटा ऑफर दिली आहे. त्याशिवाय कंपनीने नेहमीच्या ऑफर ग्राहकांसाठी दिल्या आहेत. 498 चा रिचार्ज फ्री देणारी कोणतीही ऑफर नाही. त्यामुळं या लिंकवर क्लिक करून तुमची फसवणूक होऊ देऊ नका.
हे वाचा : Coronavirus : इंटरनेटवर या गोष्टी शोधणं धोकादायक, काळजी घ्या