new tariff offers
मुंबई, 04 ऑक्टोबर : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये नेहमीच चढाओढ लागलेली असते. एअरटेल (Airtel) ने नुकताच 399 रुपयांचा पोस्टपेड (Postpaid) प्लॅन आणला आहे. हा प्लॅन आधी काही निवडक ठिकाणच्या ग्राहकांसाठी उपलब्ध होता. पण आता तो देशभरातील सर्वच युझर्सना वापरता येणार आहे. यानंतर जिओ आणि आयडिया- व्होडाफोनने देखील 399 रुपयांचा रिचार्च (Recharge) प्लॅन सुरू केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी कोणत्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत हे जाणून घेऊया. Jio च्या प्लॅनमध्ये कोणत्या ऑफर्स? गेल्याच महिन्यात Jio ने ‘Jio Postpaid Plus’ अंतर्गत 399 रुपयांचा हा प्लॅन सुरू केला. यात ग्राहकांना 75 GB डेटा देण्यात आला आहे. हा डेटा संपल्यास ग्राहकांना 1 GB डेटासाठी 10 रुपये भरून वाढीव डेटा घेण्याची सुविधाही आहे. तसंच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएसचा देखील करता येणार आहे. विशेष म्हणजे या ऑफरमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशिपदेखील मोफत मिळणार आहे. Vodafone Idea च्या प्लॅनची वैशिष्ट्यं व्होडाफोन आणि आयडियानेदेखील 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना 40 GB डेटा आणि पुढचे 6 महिने 150 GB चा डेटाही मिळतो. हे वाचा - आता चॅटिंग होणार अजूनच सोप्पं; WhatsApp आणणार 5 जबदरस्त फिचर्स या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. पण कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मच्या वापराची सुविधा देण्यात आलेली नाही. Aitel च्या प्लॅनमध्ये काय आहे खास? एअरटेलच्या 399 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच एअरटेलच्या प्लानमध्ये एका वर्षासाठी विंक म्युझिक वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसंच 399 रुपयांमध्ये तुम्हाला एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमिअमचं सब्सक्रिप्शन तसंच हॅलोट्युन्सची सुविधाही देण्यात आली आहे.