JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Jio ची धमाकेदार ऑफर! 21 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार डबल डेटा

Jio ची धमाकेदार ऑफर! 21 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार डबल डेटा

रिलायन्स जिओने नुकतंच त्यांच्या 4जी डेटा व्हाउचर्समध्ये बदल केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाउन कऱण्यात आलं आहे. यामुळे लोक घरातच अडकले असून वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळं इंटरनेट डेटाची गरजही वाढली आहे. यासाठी आता टेलिकम्युनिकेशन कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. रिलायन्स जिओने नुकतंच त्यांच्या 4जी डेटा व्हाउचर्समध्ये बदल केले आहेत. कंपनीने त्यांच्या स्वस्तातल्या प्लॅनवर डबल डेटा ऑफर दिली आहे. जिओने सर्वात कमी किंमतीचे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये 11 रुपयांपासून ते 101 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. यात 11, 21, 51 आणि 101 रुपयांचे प्लॅन असून वेगवेगळे प्लॅन उपलब्ध आहेत. कंपनीने त्यांच्या 21 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारा फायदाही वाढवला आहे. यामुळे आता ग्राहकांना 1जीबी शिवाय 2 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. तसंच कॉलिंगसाठी 500 मिनिटेही मिळतील. ही इतर नेटवर्कसाठी वापरता येतील. हे वाचा : Jio, Vodafone, Airtel ची बंपर ऑफर, डेली 1.5 GB ऐवजी मिळणार 3 GB डेटा 199 रुपयांचा स्वस्त असाही एक प्लॅन जिओने दिला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी इंटरनेट डेटा मिळतो. 28 दिवस मुदतीसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळते. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटे मिळतात. त्याशिवाय जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळणार आहे. हे वाचा : जिओच्या ग्राहकांसाठी 498 रुपयांचा रिचार्ज फ्री? व्हायरल होतोय मेसेज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या